Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: आरबीआयच्या पतधोरणाच्या दिवशी 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: भारतीय बेंचमार्क इंडेक्सने गुरुवारी विक्रमी उच्चांक गाठला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) धोरणाच्या घोषणेच्या एक दिवस आधी, 4 एप्रिललाअस्थिर सत्रात काही नफा गमावला पण तरीही तो हिरव्या रंगात बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): भारतीय बेंचमार्क इंडेक्सने गुरुवारी विक्रमी उच्चांक गाठला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) धोरणाच्या घोषणेच्या एक दिवस आधी, 4 एप्रिललाअस्थिर सत्रात काही नफा गमावला पण तरीही तो हिरव्या रंगात बंद झाला.

ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 350.81 अंकांनी अर्थात 0.47 टक्क्यांनी वाढून 74,227.63 वर बंद झाला आणि निफ्टी 80 अंकांनी म्हणजेच 0.36 टक्क्यांनी वाढून 22,514.70 वर बंद झाला. हा आजपर्यंतचा सर्वोच्च क्लोझिंग आहे.

बाजाराने गुरुवारी व्यापार सत्राची सुरुवात विक्रमी उच्चांकावर केली. सेन्सेक्स 74,501.73 आणि निफ्टी 22,619 इंट्राडे वर पोहोचला पण संपूर्ण सत्रात हिरव्या आणि लाल चिन्हांमध्ये चढ-उतार झाल्यामुळे नफा कमी झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बाजाराने दुसऱ्या सत्रात चढ-उतारांसह व्यवहार केल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. सध्याची परिस्थिती अशीच कायम राहावी अशी आशा असल्याचेही ते म्हणाले.

बाजाराची गती मुख्यत्वे बँकिंग आणि आयटी शेअर्सच्या कामगिरीवर अवलंबून असेल. गुंतवणूकदारांनी 'बाय ऑन डिप्स' पध्दत सुरू ठेवावी आणि स्टॉक निवडीवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे असेही ते म्हणाले.

गुरुवारच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहणाऱ्या निफ्टीने विक्रमी पातळीवर हँगिंग मॅन कँडलस्टिक पॅटर्न तयार केला आहे, जो सामान्यतः रिव्हर्सल पॅटर्न मानला जातो असे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले.

पण 22,600 वरील मजबूत क्लोझिंग झाल्याने बियरिश कँडल तटस्थ राहील अशी आशा आहे. 22,300 ची पातळी सपोर्ट म्हणून काम करत राहील. कमकुवत जागतिक संकेत आणि आरबीआय धोरणामुळे बाजारात अस्थिरता निर्माण होऊ शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • टायटन (TITAN)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)

  • युनायटेड फोस्फोरस लिमिटेड(UPL)

  • ए यू बँक (AUBANK)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT