Share Market Investment Tips: मंगळवारी अत्यंत अस्थिर व्यापार सत्रात भारतीय बेंचमार्क इंडेक्स किरकोळ घसरणीसह बंद झाले. निफ्टी 24,000 च्या खाली बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 125.84 अंकांच्या अर्थात 0.16 टक्क्यांच्या घसरणीसह 78,633.56 वर बंद झाला आणि निफ्टी 63.05 अंकांच्या म्हणजेच 0.26 टक्क्यांच्या घसरणीसह 23,992.55 वर बंद झाला.
सुरुवातीच्या व्यापारात तेजी आली असली तरी इंडेक्सेस आपली वाढ कायम राखू शकले नाही आणि हळूहळू सर्व तेजी गमावल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले. ट्रेडिंग सत्राच्या दुसऱ्या सहामाहीत विक्रीचा दबाव वाढला आणि इंडेक्सेसने आपली सगळी वाढ गमावली.
सत्राच्या शेवटी निफ्टी 63.05 अंकांच्या घसरणीसह 23,992.55 वर बंद झाला. संपूर्ण बाजारात संमिश्र कल दिसून आला. रिॲल्टी आणि आयटीमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली, तर सर्वात मोठी घसरण पीएसयू बँकांमध्ये दिसून आली, त्यानंतर ऑटोमध्ये ही घसरणी झाली.
ब्रॉडर मार्केटमध्ये मिडकॅप आणि स्मॉलकॅप 0.61 टक्के आणि 0.39 टक्क्यांनी घसरले. मिडकॅप्स आणि स्मॉलकॅप्सने आघाडीच्या इंडेक्सपेक्षा कमी कामगिरी केली.
आता निफ्टीचा शॉर्ट टर्म दृष्टीकोन मंदीचा झाला आहे. जोपर्यंत निफ्टी 24,400 च्या वर जाऊन ताकद दाखवत नाही तोपर्यंत तो कमजोर राहील. तर, त्याच्या 50 डीएमए म्हणजेच 23,880 च्या पातळीवर सपोर्ट दिसत आहे.
एचडीएफसी लाइफ (HDFCLIFE)
एसबीआय लाइफ (SBILIFE)
बीपीसीएल (BPCL)
श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)
भारत फोर्ज (BHARATFORG)
लुपिन लिमिटेड (LUPIN)
इंडियन हॉटेल (INDHOTEL)
एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी (HDFCAMC)
ऑरो फार्मा (AUROPHARMA)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.