Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: कालच्या घसरणीनंतर आज कसा असेल शेअर बाजार? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

राहुल शेळके

Share Market Investment Tips: भारतीय बेंचमार्क इंडेक्सेसने मागील ट्रेडिंग सत्रातील सर्व नफा गमावला आणि बुधवारी निफ्टी 24,350 च्या खाली बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 426.87 अंकांनी किंवा 0.53 टक्क्यांनी घसरून 79,924.77 वर बंद झाला आणि निफ्टी 108.70 अंकांनी म्हणजेच 0.44 टक्क्यांनी घसरून 24,324.50 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

अनेक दिवसांत पहिल्यांदाच इंडेक्स 100 हून अधिक अंकांनी घसरल्यामुळे बेअर्सचे मार्केटवर वर्चस्व असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. खालच्या टोकाला, निफ्टीला रायझिंग चॅनलच्या वरील बँडच्या अगदी वरचा सपोर्ट मिळाला. डेली चार्टवर बियरिश इंगल्फिंग पॅटर्न तयार झाला आहे.

शिवाय, विकली एक्सपायरीपूर्वी कॉल रायटिंग आणि चांगले पुट अनवाइंडिंगसह करेक्शनची शक्यता दर्शवत आहे. निफ्टीला 24,270 वर सपोर्ट आहे. जर तो 24,270 च्या खाली गेला तर निफ्टी 24,100-24,000 पर्यंत घसरेल. वरच्या बाजूला, 24,350-24,400 च्या झोनमध्ये रझिस्टंस आहे. 24,400 च्या वर गेल्यास शॉर्ट कव्हरिंगची आणखी एक फेरी दिसू शकते.

बँक निफ्टी इंडेक्सवर वरच्या स्तरावरून विक्रीचा दबाव कायम राहिला आणि तो 52500 ची पातळी ओलांडण्यात यशस्वी झाला नसल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह यांचे म्हणणे आहे. कॉल रायटर या स्तरावर सक्रिय आहेत.

इंडेक्स 52000-51800 या महत्त्वाच्या सपोर्ट झोनजवळ व्यवहार करत आहे. ही पातळी कायम राखण्यात यशस्वी झाल्यास, 52500 च्या दिशेने पुलबॅक रॅली दिसू शकते. पण 51800 चा सपोर्ट राखण्यात अयशस्वी झाल्यास ते 51300-51000 झोनच्या दिशेने आणखी घसरू शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • टिसीएस (TCS)

  • एटसीएल टेक (HCLTECH)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • ए यू बँक (AUBANK)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • पॉलीकॅब (POLYCAB)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT