Investment Tips in marathi  Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात जोरदार तेजीची शक्यता; अंबुजा सीमेंट-फेडरल बँकसह 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष

राहुल शेळके

Share Market Investment Tips: बुधवारी अर्थात 12 जूनला इंट्राडे ट्रेडमध्ये निफ्टी 23,441चा नवीन उच्चांक गाठल्यानंतर बंद झाला. सेन्सेक्स 77,079च्या सार्वकालिक उच्चांकी पातळीवर 30 अंकांनी खाली राहिला. मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि त्यानंतर मंत्रालयाच्या खात्यांचे वाटप यांना या वाढीचे श्रेय विश्लेषकांनी दिले.

सेक्टरल इंडेक्समध्ये निफ्टी मीडिया आणि निफ्टी पीएसयू बँक अव्वल राहिले. दोन्ही अनुक्रमे 2 टक्के आणि 1 टक्के वाढले. एकमेव सेक्टोरल इंडेक्स निफ्टी एफएमसीजी इंडेक्स 0.4 टक्क्यांनी घसरला. निफ्टीने गॅप-अप ओपनिंग दाखवल्यानंतर 23,441.95 चा आजपर्यंतचा उच्चांक गाठला. पण, अस्थिर सत्रानंतर, तो अखेरीस 23,322.95 या दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी 23,200 लेव्हलच्या खाली बंद झाला तर 23,100 आणि 23,000 च्या पातळीपर्यंत आणखी करेक्शन दिसू शकते असे चॉईस ब्रोकिंगचे मंदार भोजने म्हणाले. याउलट, जर इंडेक्स 23,450 पातळीच्या वर बंद झाला, तर तो 23,600 आणि त्यावरील नवीन सर्वकालीन उच्चांकावर जाऊ शकतो. बाजार 23,200 ते 23,450 च्या श्रेणीत साईडवेज आणि अस्थिर राहण्याची आशा आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अंबुजा सीमेंट (AMBUJACEM)

  • जिओ फायनान्स (JIOFIN)

  • बँक ऑफ बडोदा (BANKBARODA)

  • एबीबी इंडिया लिमिटेड (ABB)

  • ट्रेंट (TRENT)

  • एचडीएफसी एसेट मॅनेजमेंट कंपनी (HDFCAMC)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Fire: मुंबईतील इंडस्ट्रियल इस्टेट परिसर स्फोटांच्या आवाजाने हादरला, आगीचा भयानक व्हिडिओ व्हायरल

Amravati Stone Pelting: अमरावतीत भयंकर प्रकार! पोलीस स्टेशनवरच हजारो लोकांकडून दगडफेक, 21 पोलीस जखमी

Latest Maharashtra News Updates: आमदार सतेज पाटील यांनी धरला ठेका

Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

Today Navratri Colour: नवरात्रीचा चौथा रंग केशरी, 'या' मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून घ्या आउटफिट आयडिया, दिसाल सुंदर

SCROLL FOR NEXT