Investment Tips in marathi Which 10 shares perform today JSWSTEEL TATASTEEL IDEA 2 April 2024  Sakal
Share Market

Share Market Today: आज शेअर बाजारात कोणत्या शेअर्समध्ये होईल वाढ? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): भारतीय इक्विटी मार्केटने 2024-25 या आर्थिक वर्षाची दमदार सुरुवात केली. 1 एप्रिल रोजी सर्वच सेक्टर्स विशेषत: एनर्जी, रियल्टी आणि मेटल्समध्ये जोरदार खरेदीचा कल सलग तिसऱ्या सत्रातही कायम राहिला. सोमवारच्या सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 363.20 अंकांनी म्हणजे 0.49 टक्क्यांनी वाढून 74,014.55 वर आणि निफ्टी 135.10 अंकांनी म्हणजे 0.61 टक्क्यांनी वाढून 22,462 वर बंद झाला.

बीएसई मिडकॅप निर्देशांकात 1.6 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांकात सुमारे 3 टक्क्यांची वाढ झाली. हिंदुस्थान कॉपर, डीएलएफ, इंडस टॉवर्समध्ये लाॅन्ग बिल्ड-अप पाहायला मिळाले. आयशर मोटर्स, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि हीरो मोटो कॉर्पमध्ये शॉर्ट बिल्ड-अप पाहायला मिळाले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर सांगतात की, बाजाराने नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात मजबूत नोटेवर केली आणि ट्रेडिंग सत्र जसजसे पुढे सरकत गेले तसतसे त्याचा नफा वाढत असल्याचे दिसून आले. परंतु निवडक हेवीवेट्सने निर्देशांक थोडा खाली खेचला आणि ट्रेडिंग सत्र 135.10 अंकांच्या वाढीसह 22,462 वर बंद झाला.

दैनंदिन चार्टवर, निफ्टीने विक्रमी पातळीवर डोजी कँडलस्टिक पॅटर्न तयार केला. आता हा अपट्रेंड आणखी वाढवण्यासाठी, निफ्टीला 22,500चा कठीण अडथळा पार करावा लागेल, तर खालील बाजूला 22,270 वर त्याला सपोर्ट आहे.

रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा सांगतात की, सोमवाीच्या तेजीनंतर पुढील लक्ष्य आता 22,700 वर दिसत आहे. अशात बाय ऑन डीप ही रणनीती वापरण्याचा सल्ला अजित मिश्रा देतात.

आज 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष

  • जेसीडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • डीव्हीस लॅब (DIVISLAB)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • अदानी पोर्ट (ADANIPORTS)

  • आयडिया (IDEA)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • एयूबँक बँक (AUBANK)

  • गोदरेज प्रॉपर्टी (GODREJPROP)

  • इम्फासिस (MPHASIS)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

IND vs NZ 1st Test : आता आमची सटकली...! Virat Kohli - सर्फराज खान यांची तुफान फटकेबाजी; भारताचा न्यूझीलंडवर पलटवार

पोट धरून हसाल! आईसक्रीम खात IND vs NZ मॅच पाहणाऱ्या फॅनची शास्त्रींनी उडवली खिल्ली ; Funny Video

Latest Maharashtra News Updates : मुंबईतील धार्मिक संस्थांचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपने रणनीति आखली

बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला

SCROLL FOR NEXT