Share Market Investment Tips Sakal
Share Market

आठवड्याच्या पहिल्या दिवशी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

राहुल शेळके

Share Market Investment Tips: शुक्रवारी शेवटच्या सत्रात बाजारात चमक दिसून आली आणि यासह बाजार तेजीसह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 179 अंकांनी वाढून 72,026 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 52 अंकांनी वाढून 21,711 वर बंद झाला. तर निफ्टी बँक 37 अंकांनी घसरून 48,159 वर बंद झाला. त्याचवेळी मिडकॅप 87 अंकांनी वाढून 47,396 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीची सुरुवात वाढीसह झाली, मात्र तो वरच्या स्तरावर टिकून राहू शकला नाही आणि इंट्राडेमध्ये करेक्शन दिसून आल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. तरीही 21630 - 21650 च्या आसपास पुनरागमन करताना दिसून आले आणि शेवटी वाढीसह बंद झाले.

पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टी 21500 - 21850 च्या रेंजमध्ये ट्रेडिंग करताना दिसेल अशी शक्यता आहे. या रेंजच्या वर किंवा खाली दोन्ही बाजूने ब्रेक केल्यानंतरच बाजाराची दिशा स्पष्ट होईल. एकूणच बाजाराचा कल अजूनही तेजीचा आहे, पुढील काही ट्रेडींग सेशन्समध्ये कंसोलिडेशनची शक्यता आहे.

बँक निफ्टी 48640 - 47480 च्या विस्तृत श्रेणीत मजबूत होताना दिसला. बँक निफ्टी व्यापार्‍यांसाठी खूपच अस्थिर होता. या प्रक्रियेत त्यांनी 47800 चा सपोर्ट कायम ठेवला. हे त्याच्या 20-मूव्हिंग सरासरीच्या आसपास आहे. एकदा हे कंसोलीडेशन पूर्ण झाल्यावर, आपण बँक निफ्टीमध्ये आणखी वाढ पाहू शकतो. शॉर्ट टर्ममध्ये आपण बँक निफ्टी 49500 च्या दिशेने जाताना पाहू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • एल अँड टी (LT)

  • टीसीएस (TCS)

  • एसबीआय लाइफ (SBILIFE)

  • एल टी माइंडट्री लिमिटेड (LTIM)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

..तरच गोवा-तमनार प्रकल्पाला मंजुरी देणार; मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका, पंतप्रधान मोदींना पाठवलं पत्र

Alia Bhatt : "मी मोबाईलमध्ये पुरावा जपून ठेवलाय" राहामुळे झालं होतं रणबीर-आलियामध्ये भांडण ; लेकीबद्दल बोलताना अभिनेत्री भावूक

Latest Marathi News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाच्या प्रदर्शनाला भेट दिली

Viral: माझा पती दरवर्षी नवीन मुलीसोबत लग्न करतो, ५ वेळा थाटलाय संसार, पहिल्या पत्नीनं फोडलं बिंग

Sachin Pilgaonkar: श्रिया नाही तर 'ही' आहे सचिन-सुप्रिया यांची दत्तक घेतलेली मुलगी; वाचा तिचं पुढे काय झालं?

SCROLL FOR NEXT