Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारातील तुफान तेजीत कोणते शेअर्स करतील मालामाल? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: शुक्रवारी बाजारात तुफान वाढ झाली आणि या वाढीसह मार्चच्या सिरिजला चांगली सुरुवात झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी नवीन उच्चांकावर बंद झाले तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये वाढ झाली.

राहुल शेळके

Share Market Investment Tips In Marathi: शुक्रवारी बाजारात तुफान वाढ झाली आणि या वाढीसह मार्चच्या सिरिजला चांगली सुरुवात झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी नवीन उच्चांकावर बंद झाले तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये वाढ झाली. शुक्रवारी फार्मा आणि आयटी वगळता सर्व सेक्टरोल इंडेक्स तेजीत राहिले. मेटल, ऑटो आणि पीएसई शेअर्समध्ये खरेदी झाली.

एनर्जी, इन्फ्रा आणि रियल्टी शेअर्समध्येही वाढ झाली. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 1245 अंकांनी वधारला आणि 73,745 वर बंद झाला. निफ्टी 356 अंकांनी वाढून 22,339 वर बंद झाला. बँक निफ्टी 1166 अंकांनी वाढून 47,287 वर बंद झाला. तर मिडकॅप 455 अंकांनी वाढून 48,791 वर पोहोचला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीची सुरुवात नफ्याने झाली आणि दिवसभर तेजीने व्यवहार होत राहिल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. व्यवहाराच्या शेवटी तो 356 अंकांच्या वाढीसह बंद झाला. निफ्टी डेली चार्टवरील रनिंग ट्रँगल पॅटर्नमधून बाहेर पडला आहे.

हे नवीन तेजीच्या टप्प्याला सुरुवात होण्याचे संकेत देते. डेली बोलिंजर बँड्सने विस्तार करायला सुरुवात केली आहे. शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी 23000 - 23100 ची पातळी गाठेल अशी आशा आहे. तर खाली 21900 - 21860 च्या झोनमध्ये सपोर्ट दिसत आहे. हा सपोर्ट तुटल्यास घसरण वाढू शकते.

बँक निफ्टीने 45800-45600 चा सपोर्ट कायम ठेवला आहे आणि पुढचा अपट्रेंड सुरू केला आहे. ही वाढ आता बँक निफ्टीला 48630-48660 च्या झोनकडे नेऊ शकते. बँक निफ्टी वाढण्याची शक्यता आहे आणि अपट्रेंडच्या पुढील टप्प्यासाठी सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • एल अँड टी (LT)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • टायटन (TITAN)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • पेज इंडिया (PAGEIND)

  • पीएफसी (PFC)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

Swiggy IPO: स्विगीचा 11,327 कोटी रुपयांचा IPO उघडला; गुंतवणूक करावी का? काय आहे तज्ज्ञांचे मत?

Latest Marathi News Updates live : पुण्यात मित्र पक्षाला एकत्र घेत महायुतीची रणनीती ठरली

IPL Mega Auction 2025: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यांच्यासह २३ भारतीय खेळाडू २ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये; कोणाला हाय डिमांड?

Raj Thackeray: मुंबईत मनसे फॅक्टर ठरणार निर्णायक; बदललेली भूमिका वाढवतेय महायुतीची डोकेदुखी

SCROLL FOR NEXT