Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: आज कशी असेल शेअर बाजाराची दिशा? काय आहेत जागतिक संकेत?

Share Market Investment Tips (Top Shares): स्वातंत्र्यदिनानिमित्त गुरुवारी बाजार बंद होता. बुधवारी बाजार एका रेंजमध्ये व्यवहार करताना दिसला आणि काहीशा वाढीसह सपाट बंद झाला. निफ्टी बँकची फ्लॅट क्लोजिंग झाली आहे.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: स्वातंत्र्यदिनानिमित्त गुरुवारी बाजार बंद होता. बुधवारी बाजार एका रेंजमध्ये व्यवहार करताना दिसला आणि काहीशा वाढीसह सपाट बंद झाला. निफ्टी बँकची फ्लॅट क्लोजिंग झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सवर दबाव दिसून आला. मेटल आणि फार्मा शेअर्समध्ये विक्री झाली.

ऑटो, ऑइल-गॅस इंडेक्स किरकोळ वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 150 अंकांनी वाढून 79106 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 5 अंकांनी वाढून 24,144 वर बंद झाला. निफ्टी बँक 105 अंकांनी घसरून 49,727 वर बंद झाला. मिडकॅप 334 अंकांनी घसरून 56,547 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बुधवारी बाजार सुस्त राहिला आणि मंगळवारच्या घसरणीनंतर स्थिर राहिल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. संथ सुरुवातीनंतर, निफ्टीने एका रेंजमध्ये व्यवहार केला आणि शेवटी 24,143 स्तरांवर बंद झाला. आता कोणतेही मोठे देशांतर्गत ट्रिगर नसल्यामुळे, जागतिक बाजारपेठांवर लक्ष राहील.

अमेरिकन बाजारातील सौम्य रिकव्हरीमुळे काहीसा दिलासा मिळत आहे. पण सेक्टरमधील निवडक हेवीवेट स्टॉक्सवर दिसणारा दबाव रिकव्हरी मर्यादित करत आहे. बाजाराची दिशा स्पष्ट नाही. अशा परिस्थितीत, जोपर्यंत बाजाराची दिशा अधिक स्पष्ट होत नाही तोपर्यंत आपण सावध दृष्टिकोन राखला पाहिजे आणि हेज्ड धोरण स्वीकारले पाहिजे असे ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • टीसीएस (TCS)

  • एचसीएल टेक (HCLTECH)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • इन्फोसिस (INFY)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • आयडिया (IDEA)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी (HDFCAMC)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

Farmer : भरपाईपासून ५० हजार शेतकरी वंचित,गतवर्षी रब्बी हंगामात झाले होते पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT