Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): सोमवारी पीएसयू शेअर्सच्या विक्रीदरम्यान भारताच्या बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टी इंडेक्सजवळपास 0.5 टक्क्यांनी वधारल्यानंतर सपाट बंद झाले. सेन्सेक्स 17.39 अंकांनी अर्थात 0.02 टक्क्यांनी वाढून 73,895.54 वर आणि निफ्टी 33.15 अंकांनी म्हणजेच 0.15 टक्क्यांनी घसरून 22,442.70 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बँकिंग, आयटी, रिअल्टी आणि ऑटो शेअर्समधील खरेदीमुळे बाजार संमिश्र बंद झाल्याचे मेहता इक्विटीजचे प्रशांत तपासे म्हणाले. ऑईल अँड गॅस, एनर्जी, कंझ्युमर ड्यूरेबल्स आणि कॅपिटल गुड्स शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने बाजार मंगळवारी दबावाखाली राहिला. दर कपातीत उशीर आणि महागाईचे दर उच्च राहिल्याबद्दल अनिश्चितता असताना, गुंतवणूकदार निवडक शेअर्सवर लाँग टर्मसाठी सावधपणे ट्रेड करतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

डेली चार्टवर निफ्टीने बियरिश कँडल तयार केला आहे आणि इंट्राडे चार्टवर, तो लोअर टॉप फॉर्मेशन राखत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. अशा स्थितीत बाजाराचा शॉर्ट टर्म ट्रेंड अजूनही कमजोर आहे. आता, ट्रेडर्ससाठी 22600/74400 ट्रेंड डिसायडर लेव्हल ठरेल. जोपर्यंत बाजार याच्या खाली व्यवहार करत आहे, तोपर्यंत तो 22300-22250/73500-73350 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • टायटन (TITAN)

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • बीपीसीएल (BPCL)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • आयडिया (IDEA)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT