Investment Tips  Sakal
Share Market

Share Market Today: आज कसा असेल शेअर बाजार? चांगल्या कमाईसाठी हे 10 शेअर्स ठेवा तुमच्या यादीत

राहुल शेळके

Share Market Investment Tips: सोमवारी पहिल्या दिवशी बाजारात कंसोलिडेशन दिसून आले आणि सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्री झाली. बँकिंग शेअर्सवर दबाव दिसून आला. मेटल आणि फार्मा शेअर्सवर दबाव होता. एफएमसीजी, पीएसई आणि एनर्जी शेअर्समध्ये खरेदी झाली.

सेन्सेक्स 36 अंकांनी घसरला आणि 79,960 वर बंद झाला. निफ्टी 3 अंकांनी घसरून 24,321 वर बंद झाला. बँक निफ्टी 235 अंकांनी घसरून 52,426 वर बंद झाला. मिडकॅप 201 अंकांनी घसरून 56,888 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

सोमवारी निफ्टी दिवसभर मर्यादित रेंजमध्ये राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. बाजारातील सहभागींना बाजाराची दिशा ठरवण्याची घाई नसल्याचे दिसून आले. निफ्टीला 24,240 वर सपोर्ट कायम आहे. या पातळीच्या खाली गेल्यास घसरण वाढू शकते.

अशावेळी घसरणीवर खरेदी केली जाऊ शकते असे ते म्हणाले. वरच्या स्तरावर 24,375-24,400 च्या आसपास रझिस्टंस आहे, तो पार केल्यास निफ्टी 24,600 च्या दिशेने जाऊ शकतो.

बाजाराने आठवड्याची सुरुवात 24,330 वर केल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे आदित्य गग्गर यांनी सांगितले. निफ्टी दिवसभर छोट्या रेंजमध्ये फिरत राहिला. शेवटी तो 3.30 अंकांच्या किंचित घसरणीसह 24,320.55 वर बंद झाला.

निफ्टीने त्याच्या रेकॉर्ड लेव्हलच्याभोवती एक डोझी कँडलस्टिक पॅटर्न तयार केला आहे जो बुल्स आणि बेअर्स यांच्यातील अनिर्णायक स्थिति दर्शवतो. भविष्यातही बाजारात चढ-उतार होतील, असा विश्वास त्यांनी वर्तवला. डाउनसाइडवर, निफ्टीला 24,220 वर सपोर्ट असेल तर वरच्या बाजूला 24,400 वर रझिस्टंस आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • टायटन (TITAN)

  • डिव्हीस लॅब (DIVISLAB)

  • बीपीसीएल (BPCL)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • ए यू बँक (AUBANK)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • कमिन्स (CUMMINSIND)

  • आयडिया (IDEA)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fireworks Accident: गणपती विसर्जनात फटाक्याची आतिषबाजीमुळे 11 महिला ढोलवादक जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर! मंडळावर कारवाईची मागणी

Pune Firing: खानापूर गोळीबार प्रकरणातील जखमी तरुणाचा मृत्यू, गावात पोलिस बंदोबस्त वाढवला

On This Day: अफगाणिस्तानचा 'करामती' खान! राशिदने फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नाही, तर IPL, BBL अन् CPL मध्येही घेतली हॅट्रिक

Latest Marathi News Updates : Apple चा iPhone 16 खरेदीसाठी मुंबईत 'ॲपल स्टोअर'च्या बाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी

Palak Paneer Dosa: सकाळी नाश्त्यात बनवा चवदार पालक पनीर डोसा, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT