Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती? कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

राहुल शेळके

Share Market Investment Tips: मंगळवारी बाजार घसरणीसह बंद झाला. निफ्टी 21,650 च्या आसपास बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 379.46 अंकांनी म्हणजेच 0.53 टक्क्यांनी घसरून 71,892.48 वर आणि निफ्टी 76.10 अंकांनी अर्थात 0.35 टक्क्यांनी घसरून 21,665.80 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

डेली निफ्टी चार्टवर एक बियरीश कँडल तयार झाली आहे जी येत्या काळात कमजोरीचे संकेत देत असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. निफ्टी 21750 च्या खाली राहील तोपर्यंत घसरणीचा कल कायम राहण्याची अपेक्षा आहे.

21750 च्या दिशेने जाण्याचा कोणताही प्रयत्न विक्रीचा दबाव आणू शकतो. पण, 21750 वरील स्पष्ट ब्रेकआउट निफ्टीमध्ये उत्साह वाढवू शकतो. खाली 21500 वर सपोर्ट दिसत आहे.

कंसोलिडेशनदरम्यान, मोठ्या बँकिंग शेअर्सच्या खराब कामगिरीचा बाजारावर मोठ्या प्रमाणात दबाव पडत असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले.

निफ्टी 21,800 च्या वर बंद होण्यात यशस्वी झाला तरच बाजारात तेजी येईल. यावेळी, डिफेन्सिव्ह स्टॉक्स म्हणजेच एफएमसीजी शिवाय फार्मासारख्या सेक्टर्सवर फोकस करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

  • एल अँड टी (LT)

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • ए यू बँक (AUBANK)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • एम फॅसिस (MPHASIS)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: मुंबईहून पुण्याला आता दीड तासांत जाता येणार! गडकरींनी दिली नव्या हायवेची माहिती

IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद पाडू म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीचे जोरदार आंदोलन

IT Act Amendment: मुंबई हायकोर्टाचा केंद्र सरकारला दणका! IT कायद्यातील घटनादुरुस्ती रद्द करण्याचे आदेश; युट्यूब, फेसबुक, ट्विटरला दिलासा

SCROLL FOR NEXT