Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात तेजी; आज कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल?

राहुल शेळके

Share Market Investment Tips: मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ दिसून आली. निफ्टी 21,450 च्या पातळीवर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 229.84 अंकांच्या अर्थात 0.32 टक्क्यांच्या वाढीसह 71,336.80 वर बंद झाला आणि निफ्टी 91.90 अंकांच्या म्हणजेच 0.43 टक्क्यांच्या वाढीसह 21,441.30 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

भारतीय शेअर बाजाराने या छोट्या आठवड्याची सुरुवात मजबूत ट्रेंडने केली आणि जसजसा दिवस पुढे सरकत गेला त्याप्रमाणे इंडेक्समध्ये वाढ झाली आणि तो 91.95 अंकांच्या वाढीसह 21,441.35 वर बंद झाल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले.

एनर्जी आणि मेटल शेअर्समधील तेजीचा बाजारावर चांगला परिणाम झाला. तर फार्मामध्येही चांगली वाढ झाली. शिवाय मीडिया आणि आयटी शेअर्समध्ये करेक्शन दिसून आले.

केमिकल शेअर्सनी त्यांची गमावलेली तेजी परत मिळवली आणि ते दिवसाचे स्टार परफॉर्मर्स राहिले. तर डिफेंस शेअर्सनी व्हॉल्यूममध्ये नवीन उच्चांक नोंदवून त्यांची तेजी आणखी मजबूत केली.

आरएसआयमधील छुप्या बुलिश डाइव्हर्जंसने आपली भूमिका चांगली बजावली आहे कारण निफ्टी 50 इंडेक्सने डेली चार्टवर बुलिश कँडल तयार केली आहे. तो 21,593 चा पूर्वीचा उच्चांक परत मिळवण्याची शक्यता आहे. निफ्टीला 21,370 वर सपोर्ट आहे तर 21,560 वर रझिस्टंस दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • डिव्हिस लॅब (DIVISLAB)

  • हिरोमोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • एनटीपीसी (NTPC)

  • ओएनजीसी (ONGC)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • पीएफसी (PFC)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

General Coaches in Trains : मध्ये रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! मेल-एक्स्प्रेसना जोडले जाणार दोन जनरल डबे

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो १७ आणि १८ ऑक्टोबरला पाणी जपून वापरा; पालिकेकडून १०% पाणी कपात

Bomb Threats to Flights : विमानांच्या उड्डाणात धमक्यांचा अडथळा! गेल्या तीन दिवसांत बारा विमानांची उड्डाणे रद्द

Nanded Bye Poll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘या’ नावावर एकमत! पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत काय झाली चर्चा?

Sports Bulletin 15th October 2024: ICC हॉल ऑफ फेमध्ये तीन दिग्गजांचा समावेश ते भारत-न्यूझीलंड कसोटीच्या वेळेत बदल

SCROLL FOR NEXT