Share Market News esakal
Share Market

Share Market : आणखी एका कंपनीचा आयपीओ येतोय; जाणून घ्या सर्व डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

शिल्पा गुजर

शेअर बाजारात अनेक जण आयपीओवर लक्ष ठेऊन असतात. कारण शेअर मार्केटपेक्षा आयपीओतून अगदी कमी वेळेत पैसे कमावता येऊ शकतात. अशात सेबीने आणखी एका कंपनीला आयपीओसाठी मंजुरी दिली आहे. लवकरच इंडिया फर्स्ट लाइफ इंश्युरन्सचा आयपीओ येणार आहे. कंपनीला मंगळवारी ऑब्झर्वेशन फॉर्म मिळाला आहे.

आयपीओअंतर्गत 500 कोटी रुपयांपर्यंतचे फ्रेश शेअर्स जारी केले जातील असे डीआरएचपीने सांगितले. यासह कंपनीचे प्रमोटर आणि विद्यमान गुंतवणूकदार ऑफर फॉर सेलमध्ये (OFS) त्यांचे शेअर्स विकतील. यामध्ये बँक ऑफ बडोदाच्या सुमारे 8 कोटी युनियन बँकेच्या 1 कोटी इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. याशिवाय, कार्मेल पॉइंट इन्व्हेस्टमेंट (Carmel Point Investments) त्याचे 3 कोटी इक्विटी शेअर्स जारी करेल.

हेही वाचाः जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

इंडियाफर्स्ट लाइफने 21 ऑक्टोबर 2022 रोजी आयपीओसाठी अर्ज केला होता. डीआरएचपीनुसार फ्रेश शेअर्स जारी करून उभारलेले 500 कोटी रुपये कंपनीच्या सॉल्व्हेंसी लेव्हलला सपोर्ट देऊन कॅपिटल बेस वाढवण्यासाठी केला जाईल. आयसीआयसीआय सिक्युरिटीज, ऍम्बिट प्रायव्हेट लिमिटेड, बीएनपी पारिबास, बीओबी कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि जेएम फायनांशियल बूक रनिंग लीड मॅनेजर आहेत. तर केफिन टेक्नोलॉजीज आयपीओसाठी रजिस्ट्रार असतील.

आर्थिक वर्ष 2022 मध्ये रिटायरमेंट प्लान बाबतीत, ही मुंबईस्थित कंपनी प्रायव्हेट लाइफ इंश्युरन्स सेक्टरमधील सर्वात वेगाने वाढणारी कंपनी आहे. 30 जून 2022 पर्यंत, कंपनी 29 रिटेल प्रोडक्ट्स ऑफर करत आहे. यात 16 नॉन-पार्टिसिपेंट प्रॉडक्ट्स, 9 पार्टिसिपेंट्स प्रॉडक्ट्स, 4 ULIPs सह 13 ग्रूप प्रॉडक्ट्सचा समावेश आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे 46,178 मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT