Ipo Worth Rs 60 Thousand Crores To Open In New Year 2024 know details  Sakal
Share Market

Upcoming IPO: नववर्षात कमाईची मोठी संधी! २०२४मध्ये येणार ६० हजार कोटींचे आयपीओ

Upcoming IPO: नवनवे विक्रम नोंदविणाऱ्या भारतीय शेअर बाजारांमध्ये यंदा प्राथमिक शेअर विक्री योजनेच्या (आयपीओ) माध्यमातून मोठ्या प्रमाणात नव्या कंपन्यांनी पदार्पण केले. नव्या वर्षातही शेअर बाजारात आयपीओंची चलती राहणार आहे.

राहुल शेळके

मुंबई, ता. २२ : नवनवे विक्रम नोंदविणाऱ्या भारतीय शेअर बाजारांमध्ये यंदा प्राथमिक शेअर विक्री योजनेच्या (आयपीओ) माध्यमातून मोठ्या प्रमाणात नव्या कंपन्यांनी पदार्पण केले. नव्या वर्षातही शेअर बाजारात आयपीओंची चलती राहणार असून, तब्बल ६० हजार कोटी रुपयांचे आयपीओ येण्याचा अंदाज आहे.

‘प्राइम डेटाबेस’च्या आकडेवारीनुसार, या वर्षी ८० कंपन्यांनी ‘सेबी’कडे आयपीओसाठी अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यातील ५७ कंपन्यांनी आयपीओ दाखल केले आणि सुमारे ४९ हजार कोटी रुपये उभे केले.

आयपीओसाठी अर्ज करणाऱ्या कंपन्यांची संख्या मागील दोन वर्षांच्या तुलनेत कमी आहे. याशिवाय २७ कंपन्यांना बाजार नियामक ‘सेबी’कडून २९ हजार कोटी रुपये उभारण्याची परवानगी मिळाली असून, आणखी २९ कंपन्या ३४ हजार कोटी रुपये उभारण्यासाठी ‘सेबी’च्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

या वर्षी टाटा समूहाने १९ वर्षांनी आणलेल्या टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओचा शेअर बाजारात मोठा गाजावाजा झाला. या आयपीओसाठी तब्बल ७० पट बोली लागली.

डिसेंबर महिन्यातील बहुतांश सर्व आयपीओंना गुंतवणूकदारांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, अनेकपट बोली लागत आहे. नोंदणी होताना शेअरची किंमतही अनेकपटींनी वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनाही भरपूर फायदा झाला आहे.

शेअर बाजारातील तेजीमुळे नव्या गुंतवणूकदारांची संख्याही वाढली आहे. त्याचाही लाभ आयपीओंना मिळत आहे.

नव्यावर्षातही तेजीचाच कल कायम राहण्याची शक्यता असून, भारतीय अर्थव्यवस्थेची जोरदार वाढ अनेक कंपन्यांना शेअर बाजारात उतरण्यासाठी उद्युक्त करत आहे.

ओला इलेक्ट्रिक, स्विगी आणि फर्स्ट क्रायसारख्या अनेक मोठ्या कंपन्या आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत आहेत. या तीन कंपन्या प्रत्येकी चार हजार कोटी रुपयांचा आयपीओ आणण्याची शक्यता आहे. याशिवाय एबिक्सक्रश, टाटा प्ले, इंडेजीन, ओरावेल स्टेज, गो डिजिट जनरल इन्शुरन्स, टीबीओ टेक आदी कंपन्याही रांगेत आहेत.

भारतीय अर्थव्यवस्थेची मजबूत वाढ, पुरेशी तरलता, अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेची व्याजदरातील कपात, रिझर्व्ह बँकेचे व्याजदर स्थिर ठेवण्याचे धोरण; तसेच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाची शक्यता असल्याने स्थिर सरकारच्या अपेक्षेने शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.

त्याचा सकारात्मक परिणाम आयपीओ बाजारावरही दिसून येत आहे. हाच तेजीचा कल कायम राहाण्याची शक्यता आहे, असे विश्लेषकांचे मत आहे.

गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद

शेअर बाजारात या वर्षात ५७ कंपन्यांनी आयपीओ आणले. ही गेल्या दहा वर्षांतील दुसरी सर्वाधिक संख्या आहे. जानेवारी ते मे २०२३ या कालावधीत केवळ पाच आयपीओ आले. त्यानंतर जून ते डिसेंबर या कालावधीत ५२ आयपीओ आले आहेत.

सप्टेंबरमध्ये सर्वाधिक १४ आयपीओ आले, तर डिसेंबरअखेरपर्यंत आयपीओंची एकूण संख्या ११ आहे. ‘सेबी’कडून आणखी २७ कंपन्यांना २९ हजार कोटी रुपये उभारण्याची परवानगी मिळाली असून, आणखी २९ कंपन्या ३४ हजार कोटी रुपये उभारण्यासाठी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

Farmer : भरपाईपासून ५० हजार शेतकरी वंचित,गतवर्षी रब्बी हंगामात झाले होते पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT