PSU Stock esakal
Share Market

PSU Stock : ३२ रुपयांचा शेअर ३०० पार, गुंतवणुकदारांची गुंतवणूक दुप्पट

PSU Stock : इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या (IREDA) शेअर्सने नुकताच इंट्रा-डेमध्ये पहिल्यांदाच 300 रुपयांचा टप्पा ओलांडला.

सकाळ डिजिटल टीम

PSU Stock : इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या (IREDA) शेअर्सने नुकताच इंट्रा-डेमध्ये पहिल्यांदाच 300 रुपयांचा टप्पा ओलांडला. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये, त्याचे शेअर्स आयपीओ गुंतवणूकदारांना 32 रुपयांना जारी करण्यात आले होते, याचा अर्थ त्यांच्या संपत्तीत एका वर्षापेक्षा कमी कालावधीत 9 पटीने वाढ झाली आहे.

शुक्रवारी दिवसभरात या शेअर्सने 7.40 टक्क्यांनी वाढीसह 304.60 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. प्रॉफिट बुकींगमुळे भाव नरमला आणि दिवसअखेर 0.37 टक्क्यांच्या वाढीसह 284.65 रुपयांवर बंद झाला.

IREDA चे शेअर्स गेल्या सहा दिवसांत पाच दिवस वाढले आहेत. जून तिमाहीसाठी त्याचा शेअरहोल्डिंग पॅटर्न गुरुवारी उघड झाला आणि हे उघड झाले की परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) त्यात त्यांचा हिस्सा दुप्पट केला आहे.

जून तिमाहीच्या अखेरीस, मार्च तिमाहीतील 1.36 टक्क्यांच्या तुलनेत एफपीआयचा हिस्सा वाढून 2.7 टक्के झाला. मात्र, कोणाचीही हिस्सेदारी 1 टक्क्यांपेक्षा जास्त नसल्याने नाव जाहीर करण्यात आलेले नाही. या कालावधीत लहान शेअरहोल्डर्सची म्हणजेच 2 लाखांपेक्षा कमी गुंतवणूक असलेल्या गुंतवणूकदारांची संख्या 21.23 लाखांवरून 22.15 लाखांपर्यंत वाढली आहे. दुसरीकडे, देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी त्यांचे स्टेक 0.53 टक्क्यांवरून 0.24 टक्क्यांवर आणले आहेत.

IREDA चे शेअर्स गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर 2023 रोजी लिस्ट झाले होते. आता त्याचा एफपीओ आणण्याची योजना आहे. जूनच्या सुरुवातीला सरकारकडून 4000-5000 कोटीच्या एफपीओसाठी मंजुरी मागितल्याचे समजत आहे. कंपनी ज्या वेगाने वाढत आहे ते पाहता तिला अधिक इक्विटी कॅपिटलची आवश्यक असेल असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी, कंपनीने 2,150.21 कोटीचा आयपीओ लाँच केला होता, त्यापैकी 860.08 कोटीची ऑफर फॉर सेल (OFS) होती.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT