Jagsonpal Pharmaceuticals Sakal
Share Market

Jagsonpal Pharmaceuticals : जगसनपाल फार्मास्युटिकल्स

सकाळ वृत्तसेवा

- ऋत्विक जाधव

जगसनपाल फार्मास्युटिकल्स लि. ही औषधनिर्माण अर्थात फार्मास्युटिकल क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीचे बाजारमूल्य ११८४५४.२६ लाख रुपये असून, शेअर बाजारातील आरोग्यसेवा क्षेत्रीय निर्देशांकांतर्गत तिचा समावेश होतो.

फेब्रुवारी २०२२ मध्ये, इन्फिनिटी होल्डिंग्ज (कन्व्हर्जंट फायनान्स कंपनीचा भाग) या कंपनीने ‘जगसन फार्मा’ कंपनीचा ४४ टक्के हिस्सा २३५ रुपये प्रति शेअर या भावाने २७० कोटींना विकत घेतला.

कन्व्हर्जंट फायनान्स ही फेअरफॅक्स इंडिया फार्मास्युटिकल्स लि.द्वारे सुरू केलेली पीई फर्म आहे. ती प्रामुख्याने फार्मास्युटिकल उत्पादने आणि व्यापारात गुंतलेली असून, ती देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही बाजारांमध्ये कार्यरत आहे.

ही कंपनी ॲलर्जी व्यवस्थापन, प्रतिकारशक्ती, सेल संरक्षण, दंतवैद्य आणि ईएनटी, महिला आरोग्यसेवा, हाडे आणि सांधे यांची काळजी यासारख्या प्रमुख उपचारात्मक क्षेत्रांतर्गत औषधी उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करते.

कंपनीच्या महसुलात स्त्रीरोग आणि ऑर्थोपेडिक विभागांचे लक्षणीय योगदान आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये महसुलात या विभागांचे एकत्रितपणे योगदान ७१ टक्के आहे. कंपनीच्या विक्री केल्या जाणाऱ्या मालापैकी फक्त दहा टक्के माल हा कंपनीच्या प्रकल्पामध्ये उत्पादित केला जातो. उरलेले ९० टक्के उत्पादन `लोन लायसनिंग ॲरेंजमेंट’ पद्धतीने तयार केले जाते.

शेअरचा इतिहास

जानेवारी १९९९ मध्ये १०.४ रुपयांवर नोंदणी झालेल्या या शेअरने आजपर्यंत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. तो सुमारे ४४६० टक्के इतका आहे. दीर्घकालीन चार्टवर, हा शेअर जुलै २०२२ पासून वाढत्या ट्रेंडमध्ये होता, त्यानंतर ऑगस्ट २०२२ पासून कन्सॉलिडेशन दिसून आले. हा शेअर दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्यात कधीही अयशस्वी ठरला नाही. तांत्रिकदृष्ट्या शेअर एका बाजूने ट्रेंडमध्ये आहे आणि कन्सॉलिडेशनमधून बाहेर पडत आहे.

तांत्रिक माहिती

या शेअरचा चार्ट पॅटर्न इतरांच्या तुलनेत सर्वांत मजबूत असून, हा शेअर गेल्या काही दिवसांपासून मजबूत होण्याची चिन्हे दाखवत आहे. शुक्रवारी (ता. २८ जुलै) त्याने जोरदार ब्रेकआउट दिला आहे. यात ‘बुलिश ट्रॅगल पॅटर्न’ची निर्मिती दिसत असून, तो ऑगस्ट २०२२ पासून मजबूती दाखवत आहे. यावरून शेअरची भविष्यातील ताकद आणि क्षमता दिसून येते.

डेरिव्हेटिव्ह डेटादेखील तेजीच्या बाजूने आहे. भविष्यातील ‘ओआय’मध्ये लाँग बिल्डअप दिसून येते, जे अल्पावधीतही ताकद दर्शवते. ४५२ रुपयांच्या आसपास ट्रेडिंग करताना साप्ताहिक बंद आधारावर ३८० रुपयांचा स्टॉपलॉस ठेवून ४५० ते ४०० रुपयांच्या पातळीमध्ये याची खरेदी करणे सुरू केले पाहिजे.

येत्या काही दिवसांत या शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अल्पमुदतीसाठी, ६५० रुपयांचे, तर दीर्घमुदतीसाठी ८०० रुपये उद्दिष्ट आहे. अल्प-मुदतीच्या उद्दिष्टासाठी, ‘रिस्क टू रिवॉर्ड’ गुणोत्तर १ः५ आहे, जे गुंतवणुकीचा निर्णय अधिक उत्तम बनवते. अल्प जोखीम घेऊन, आम्ही मोठ्या उद्दिष्टाची अपेक्षा करत आहोत. या आधारावर ५० टक्क्यांच्या आसपास नफ्याच्या अपेक्षेने यात गुंतवणूक करू शकतो.

शेअरचे नाव

जगसनपाल फार्मास्युटिकल्स लि.

  • शिफारस : खरेदी करा

  • ताजा भाव : रु. ४५२. १५

  • स्टॉपलॉस : रु. ३८०

  • उद्दिष्ट : रु. ६५०

  • कालावधी : सहा ते आठ महिने

(डिसक्लेमर आणि डिसक्लोजर ः वरील शिफारस पूर्णपणे तांत्रिक विश्लेषणावर आधारित आहे, जी भविष्यातील किमतीच्या हालचालीचा अंदाज लावण्याचा एक प्रकारचा वैज्ञानिक मार्ग आहे. सर्व गुंतवणूकदारांनी इक्विटी गुंतवणुकीतील जोखमींबद्दल योग्य माहिती घ्यावी. लेखकांचे या शेअरमध्ये वा कंपनीमध्ये कोणतेही वैयक्तिक हितसंबंध नाहीत. तथापि, त्यांच्या काही क्लायंटची यात गुंतवणूक असू शकते.)

(लेखक हे टेक्निकल ॲनालिस्ट असून, किरण जाधव अँड असोसिएट्समध्ये कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT