Jio Financial Services Listing: गेल्या महिन्यात देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजपासून विभक्त झाल्यानंतर, मुकेश अंबानीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा जेएफएसएलचे शेअर्स सोमवारी म्हणजेच आज, बीएसई आणि एनएसई या स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध केले जातील.
लिस्टिंगच्या आधी, NBFC कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जवळपास 300 रुपयांवर ट्रेडिंग करत आहेत, जे 261.85 च्या प्री-लिस्टिंग किंमतीपेक्षा जास्त आहे.
पहिले 10 दिवस, Jio Financial Services चे शेअर्स ट्रेड-टू-ट्रेड सेगमेंटमध्ये ठेवले जातील. याचा अर्थ स्टॉकमध्ये इंट्राडे ट्रेडिंग शक्य होणार नाही आणि दोन्ही बाजूला 5 टक्के सर्किट मर्यादा असेल.
पहिल्या 10 दिवसांसाठी या स्टॉकची T-ग्रुपमध्ये खरेदी-विक्री केली जाईल, म्हणजेच तो दहा दिवस इंट्राडेमध्ये व्यापार करू शकणार नाही.
रिलायन्सच्या शेअरच्या बदल्यात एक शेअर मिळाला
20 जुलैच्या रेकॉर्ड तारखेला विशेष ट्रेडिंगमध्ये, Jio Financial ची प्री-लिस्टिंग किंमत रु. 261.85 प्रति शेअर झाली, जी ब्रोकरेज अंदाजे रु. 190 आणि RIL च्या अधिग्रहणाची किंमत रु. 133 ने जास्त होती.
NBFC चे शेअर्स 1:1 च्या प्रमाणात पात्र RIL भागधारकांच्या डिमॅट खात्यांमध्ये गेल्या आठवड्यात जमा करण्यात आले, याचा अर्थ 20 जुलैच्या रेकॉर्ड तारखेपर्यंत RIL च्या प्रत्येक शेअरमागे, भागधारकांना JFSL चा एक शेअर मिळाला.
विश्लेषकांचे काय मत आहे?
काही विश्लेषक एकीकडे भारतातील वित्तीय सेवांची मागणी आणि कंपनीची मजबूत पकड यावर आशा पल्लवित करत आहेत, तर दुसरीकडे काही तज्ञ मात्र सावध आहेत.
राइट रिसर्चच्या संस्थापक आणि फंड मॅनेजर सोनम श्रीवास्तव यांच्या मते, त्यांचे आक्षेप या आहेत की जिओ फायनान्शिअल अद्याप त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि अद्याप नफा मिळवू शकलेला नाही.
सोनम श्रीवास्तव सुचवतात की ज्या RIL भागधारकांनी जिओ फायनान्शिअलचे शेअर्स डिमर्जरमुळे घेतले आहेत त्यांनी ते दीर्घ मुदतीसाठी राखून ठेवावेत.
दीर्घ मुदतीसाठी शेअर्स ठेवण्याचा सल्ला
अपूर्व शेठ यांच्या मते, गुंतवणूकदारांनी जिओ फायनान्शिअलकडून अल्प आणि मध्यावधीत कोणत्याही चमत्काराची अपेक्षा करू नये. शेठ यांचे म्हणणे आहे की, जे गुंतवणूकदार प्रतीक्षा करू शकतात त्यांनी हे स्टॉक त्यांच्याकडे किमान 5 वर्षे ठेवावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.