stock sakal
Share Market

Stock Market : येत्या 6-12 महिन्यात हा सिमेंट स्टॉक देईल दमदार परतावा ; एका वर्षात 60% परताव्याचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

सिमेंट सेक्टर्समध्ये सध्या चांगली वाढ दिसून येत आहे. अशात ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय डायरेक्टने सिमेंट सेक्टर्समधील कंपनी जेके सिमेंटचा (JK Cement) स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनी वेळेत आपली क्षमता वाढवेल, ज्यामुळे मजबूत वाढ होईल असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. गेल्या एका वर्षात या स्टॉकमध्ये 60 टक्क्यांहून अधिक वाढ दिसली आहे.

आयसीआयसीआय डायरेक्टने सिमेंट सेक्टर्सधील कंपनी जेके सिमेंटला खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजने त्यांचा हाय कन्विकशन आयडियामध्ये समावेश केला आहे. येत्या 6-12 महिन्यात 5175 रुपयांचे टारगेट दिले आहे. 29 जानेवारी 2024 रोजी हा शेअर सुमारे 4300 रुपये होता. अशा प्रकारे, सध्याच्या किमतीवरून, स्टॉक सुमारे 20 टक्के मजबूत परतावा देऊ शकतो. गेल्या एका वर्षात हा शेअर 60 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. तर 6 महिन्यांत त्याने 30 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

जेके सिमेंट आपली क्षमता वाढवत असल्याचे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. ग्रे सिमेंटची क्षमता आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 30 एमटीपीए असेल. क्षमतेत वाढ केल्यामुळे, कंपनीला व्हॉल्यूम वाढीचा फायदा होईल आणि ती डबल डिजिटमध्ये राहू शकेल. याशिवाय कंपनीचा मार्केट शेअरही वाढणार आहे.

आर्थिक वर्ष 2023-2026E मध्ये कंपनीच्या ऑपरेशनल आणि आर्थिक कामगिरीत सुधारणा होईल असा ब्रोकरेजचा विश्वास आहे. आर्थिक वर्ष 2023-25E मध्ये महसूल सीएजीआर 13 टक्के असू शकतो. तर एबिटदा सीएजीआर 28 टक्के आणि पीएटी 41 टक्के असू शकतो.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dussehra gold prices: दसऱ्याला सोन्याची झळाळी, सोनेखरेदीसाठी नागरिकांची तुडुंब गर्दी, काय आहे आजचा सोन्याचा भाव?

Prathamesh Parab : पाण्यासाठी भांडणं ते चार पायऱ्यांवरचं गल्ली क्रिकेट ; प्रथमेशने उलगडल्या त्याच्या चाळीतील घरातील आठवणी

Latest Maharashtra News Updates : किरकोळ बाजारात झेंडू दोनशे पार! फूल विक्रेत्यांकडून भाविकांची चांगलीच लूट

Maratha Reservaton: मराठा समाज व्होट बँक, म्हणूनच दिले आरक्षण; याचिकाकर्त्याचा न्यायालयात युक्तिवाद

Ravan Dahan Upay: दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रावण दहनाची राख घरी आणावी की नाही?

SCROLL FOR NEXT