ज्युनिपर हॉटेल्सचा (Juniper Hotels) आयपीओ 21 फेब्रुवारीला उघडणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून 1800 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. 23 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी असेल. या आयपीओसाठी प्राइस बँड लवकरच जाहीर केला जाईल. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार, इश्यू साइजच्या 10 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील.
जुनिपर हॉटेल्स ही एक लक्झरी हॉटेल डेव्हलपमेंट आणि ओनरशिप कंपनी आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत, रूम्सच्या संख्येनुसार हे भारतातील हयातशी संलग्न हॉटेलचे सर्वात मोठे मालक आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत, कंपनीकडे सात हॉटेल्स आणि सर्व्हिस अपार्टमेंटचा पोर्टफोलिओ आहे.
जुनिपर हॉटेल्सचे मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, लखनौ, रायपूर आणि हम्पी या अनेक शहरांमध्ये लक्झरी हॉटेल्सआहेत असे असे कंपनीने एपीओ कागदपत्रांमध्ये म्हटले आहे. ज्युनिपर हॉटेल्स ही भारतातील एकमेव हॉटेल डेव्हलपमेंट कंपनी आहे ज्यामध्ये हयातने धोरणात्मक गुंतवणूक केली आहे. या निधीचा उपयोग जुनिपर हॉटेल्स 1500 कोटीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी करणार असल्याचे म्हटले आहे. उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाईल.
भारतातील हॉटेल्सची एकूण मागणी सीएजीआर आर्थिक वर्ष 2023 आणि आर्थिक वर्ष 2028 दरम्यान 11.6 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अंदाज आहे. मार्च FY23 मध्ये संपलेल्या वर्षात जुनिपर हॉटेल्सचा निव्वळ तोटा 1.5 कोटी होता, जो मागील वर्षीच्या 188 कोटींपेक्षा लक्षणीय कमी होता. याच कालावधीत ऑपरेशन्समधील महसूल 308.7 कोटींवरून दुप्पट होऊन 666.85 कोटी झाला आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.