केपीआर मिल’ ही देशातील सर्वांत मोठ्या पोशाखनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे सामर्थ्य तिच्या एकात्मिक व्यवसाय मॉडेलमध्ये आहे, जे सातत्यपूर्ण नफा प्राप्त करण्यात मदत करते. कंपनी अस्थिर सूत व्यवसायातून फायदेशीर वस्त्रप्रावरणे व्यवसायाकडे वाटचाल करत आहे. कंपनीकडे तंत्रज्ञानाभिमुख क्षमतेसह १२ उत्पादन केंद्रे आहेत. कंपनीने २०१९मध्ये आपला ब्रँड ‘फासो’मार्फत इनरवेअर आणि ॲथलिझर वेअर यानंतर स्पोर्टसवेअर दाखल केले, ज्याला बाजारात उत्साही प्रतिसाद मिळाला.
कंपनीचा साखर उत्पादन, इथेनॉल निर्मिती; तसेच वीजनिर्मितीचा व्यवसायदेखील आहे. एकूण महसुलात सुमारे ६२ टक्के देशांतर्गत बाजाराचा, तर ३८ टक्के वाटा निर्यातीचा आहे. कंपनी ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोपसह ६० हून अधिक देशांमध्ये निर्यात करते. गेल्या १० वर्षांत कंपनीने महसुलात; तसेच नफ्यामध्ये प्रति वर्ष १४ टक्के वाढ दर्शविली आहे.
गेली अनेक वर्षे व्यवसाय करताना कापड उद्योगात लागणाऱ्या कापसाच्या किमतीतील चढ-उतारांचे कंपनीने प्रभावीपणे व्यवस्थापन केले आहे. ‘कॅपेक्स’ अर्थात भांडवली खर्च म्हणजेच एखाद्या कंपनीद्वारे मालमत्ता, इमारती, तंत्रज्ञान किंवा उपकरणे यासारख्या भौतिक मालमत्ता प्राप्त करण्यासाठी किंवा सुधारणा करण्यासाठी वापरलेला निधी. ‘कॅपेक्स’चा वापर कंपनीकडून अनेकदा नवे प्रकल्प किंवा गुंतवणूक करण्यासाठी केला जातो.
‘केपीआर मिल’ने आधुनिकीकरण आणि क्षमता विस्तारासाठी ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत महसुलात सुमारे २५० कोटी रुपयांची भर पडेल व नफा वाढण्याची अपेक्षा आहे. कर्जाचे प्रमाण कमी ठेऊन धंद्यात गुंतविलेल्या भांडवलावर सातत्याने प्रतिवर्ष १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत, ही कंपनी कार्यक्षेत्रात प्रगती करत आहे.
‘चायना प्लस वन’ अर्थात चीनसारख्या एकाच देशावर अवलंबून राहण्याऐवजी ग्राहक कंपन्यांच्या भारताकडे होत असलेल्या व्यवसाय स्थित्यंतराचादेखील या कंपनीस भविष्यात फायदा मिळू शकतो. भारताच्या वाढत्या क्षमतेमुळे कापड निर्यातीत होत असलेल्या वाढीची शक्यता, ‘चायना प्लस वन’ घटक, साखर आणि कापड व्यवसायातील मजबूत क्षमताविस्तार, सरकारकडून अतिरिक्त इथेनॉल करार आदी सर्व घटकांचा विचार करता, जोखीम लक्षात घेऊन या शेअरमध्ये दीर्घावधीच्या दृष्टीने मर्यादित प्रमाणात गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.