Leela Palaces, Hotels & Resorts IPO Sakal
Share Market

IPO Alert: हॉटेल क्षेत्रातील सर्वात मोठा IPO येणार; टाटांना देणार टक्कर, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहिती

Leela Palaces, Hotels & Resorts IPO: लीला पॅलेस हॉटेलची मूळ कंपनी देशातील सर्वात मोठा IPO आणत आहे. कंपनीने रविवारी सेबीकडे आयपीओसाठी अर्ज केला आहे. लीला हॉटेलची मूळ कंपनी किती मोठा IPO आणत आहे ते जाणून घेऊया.

राहुल शेळके

Leela Palaces, Hotels & Resorts IPO: लीला पॅलेस हॉटेलची मूळ कंपनी देशातील सर्वात मोठा IPO आणत आहे. कंपनीने रविवारी सेबीकडे आयपीओसाठी अर्ज केला आहे. लीला हॉटेलची मूळ कंपनी किती मोठा IPO आणत आहे ते जाणून घेऊया.

लीला पॅलेस हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चालवणारी कंपनी स्क्लोस बेंगलोर लिमिटेडने IPO द्वारे 5,000 कोटी रुपये उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रे दाखल केली आहेत. हा IPO हॉटेल क्षेत्रातील सर्वात मोठा IPO मानला जात आहे.

हॉटेल क्षेत्रातील सर्वात मोठा IPO येणार

विशेष म्हणजे देशातील सर्वात मोठी हॉटेल चेन कंपनी इंडियन हॉटेलचा आयपीओही तेवढा मोठा नव्हता. ही कंपनी ताज हॉटेल्स चालवते. देशातील मोठ्या हॉटेल्समध्ये लीला पॅलेसचाही समावेश होतो. लीला पॅलेस आपला व्यवसाय वाढवण्यासाठी हा आयपीओ आणत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

हे दिग्गज जबाबदारी सांभाळणार

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे दाखल केलेल्या प्राथमिक कागदपत्रांनुसार, कंपनीच्या प्रस्तावित IPO मध्ये 3,000 कोटींच्या नवीन इक्विटी आणि 2,000 कोटींच्या OFSचा समावेश आहे.

या IPO चे बुक रनिंग मॅनेजर JM Financial, BoAF Securities India, Morgan Stanley India, JP Morgan India, Kotak Mahindra Capital, Axis Capital, Citigroup Global Markets India, IIFL Securities, ICICI Securities, Motilal Oswal Investment Advisors आणि SBI Capital Markets आहेत.

कंपनीवर किती कर्ज आहे?

ताज्या इश्यूमधून मिळालेली रक्कम कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरली जाईल. मार्च 2024 पर्यंत कंपनीने एकूण 4,052.50 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कंपनी IPO पूर्व नियोजनाच्या टप्प्यात 600 कोटी रुपये उभारण्याचा विचार करू शकते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT