Lemon Tree shares trade 2 percent higher after Gujarat hotel deal  Sakal
Share Market

Lemon Tree Share: शेअर बाजारात घसरण, पण लेमन ट्री शेअर्समध्ये तुफान तेजी, काय आहे कारण?

Lemon Tree Share: कंपनीचे मार्केट कॅप 9,732.75 कोटी रुपये आहे.

राहुल शेळके

Lemon Tree Share: लेमन ट्री हॉटेल्सच्या शेअर्समध्ये सध्या चढ - उतार दिसून येत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये नुकतीच एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली. मात्र, नंतर रिकव्हरी दिसून आली. सध्या हा शेअर 1.15 टक्क्यांनी वाढून 122.75 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीने उत्तराखंडमध्ये 72 खोल्यांच्या मालमत्तेसाठी लायसन्स ऍग्रीमेंटवर सही केली आहे. कंपनीचे मार्केट कॅप 9,732.75 कोटी रुपये आहे.

ही प्रॉपर्टी आर्थिक वर्ष 2025 पर्यंत उघडणे अपेक्षित आहे. लेमन ट्री हॉटेल्सची पूर्ण मालकीची उपकंपनी कार्नेशन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे व्यवस्थापन केले जाणार आहे. 16 ऑक्टोबरला कंपनीने डेहराडून, उत्तराखंड इथे 55 खोल्यांच्या मालमत्तेसाठी परवाना करार केला होता.

या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने गुजरातमधील सोमनाथ इथे रिसॉर्ट उघडण्यासाठी आर्टिसन रिसॉर्ट्ससोबत फ्रँचायझी कराराची घोषणा केली. कंपनीने मॅक्लिओडगंज इथे आपली लेटेस्ट फ्रेंचायझी प्रॉपर्टी लेमन ट्री हॉटेल उघडली, जी हिमाचल प्रदेशमधील ग्रुपची तिसरी प्रॉपर्टी आहे.

भारतातील आणि जगातील हे 95वे लेमन ट्री हॉटेल आहे. कंपनीने पेनिनसुला सूट्स लाँच केले, बेंगळुरूमध्ये लेमन ट्री अंतर्गत ही सहावी प्रॉपर्टी आहे.

कंपनीने गुजरात आणि नेपाळमधील दोन प्रॉपर्टीजसाठी परवाना करारही केलाय. यासोबतच लेमन ट्री प्रीमियर ब्रँड अंतर्गत डेहराडूनमध्ये 80 खोल्यांच्या प्रॉपर्टीसाठी करारही करण्यात आला आहे.

ऑगस्टमध्ये, कंपनीने भुवनेश्वरमधील लेमन ट्री हॉटेल ब्रँड आणि कसौलीजवळच्या लेमन ट्री माउंटन रिसॉर्ट या दोन प्रॉपर्टीसाठी परवाना करार केला.

जुलैमध्ये, कंपनीने पंजाबमधील 80 खोल्यांच्या प्रॉपर्टीसाठी आणि गोमती नगर, लखनऊमध्ये 72 खोल्यांच्या प्रॉपर्टीसाठी परवाना करार केला आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT