LTIMindtree zooms 4 percent to 52-week high on launch of Mexico City delivery hub  Sakal
Share Market

LTIMindtree: एलटीआय माइंडट्रीच्या शेअर्सने गाठला 52 आठवड्यांचा उच्चांक, काय आहे कारण?

LTIMindtree Shares: आनंद राठीच्या विश्लेषकांनी एलटीआय माइंडट्रीवर 'बाय' रेटिंग कायम ठेवले आहे.

राहुल शेळके

LTIMindtree Shares: एलटीआय माइंडट्री (LTIMindtree) कंपनीच्या शेअर्समध्ये सध्या दमदार तेजी सुरु आहे. लॅटिन अमेरिकेत आपला व्यवसाय वाढवण्याच्या उद्दीष्टाने त्यांनी मेक्सिको सिटीमध्ये एक डिलिव्हरी सेंटर सुरू केले, या बातमीनंतर एलटी माइंडट्रीचे शेअर्स 4.5 टक्क्यांच्या तेजीसह 6,215.8 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले.

एलटीआय माइंडट्रीचे मेक्सिकोमधील ग्राहक दूरसंचार, मीडिया आणि मनोरंजन, कंस्ट्रक्शन, टेक्नोलॉजी अँड सर्व्हिसेज, बँकिंग आणि फायनांशियल सर्व्हिसेज आणि आरसीजीसारख्या क्षेत्रांमधून येतात. कंपनीची संपूर्ण युनायटेड स्टेट्समध्ये 12 कार्यालये आहेत आणि 70 पेक्षा जास्त फॉर्च्यून 500 कंपन्या या ग्राहक लिस्टमध्ये समाविष्ट आहेत.

मेक्सिकोमध्ये या सेंटरमुळे आम्ही आमच्या जवळपासच्या आणि स्थानिक ग्राहकांना त्याच टाइम-झोनमध्ये प्रोग्राम्स पोहोचवू शकू असे कंपनीचे संचालक आणि सीओओ नचिकेत देशपांडे म्हणाले.

आनंद राठीच्या विश्लेषकांनी दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर एलटीआय माइंडट्रीवर 'बाय' रेटिंग कायम ठेवले आहे. 2024 आणि 2026 या आर्थिक वर्षांमध्ये, एलटीआय माइंडट्रीच्या महसुलात वार्षिक आधारावर 12 टक्के वाढ होऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे.

त्याच वेळी, कंपनीचे एबिट मार्जिन आर्थिक वर्ष 2024 पर्यंत 16.6 टक्क्यांवरून आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 18.7 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. यामुळे एबिट सीएजीआर 19 टक्क्यांवर येऊ शकतो. अशा परिस्थितीत 2026 च्या आर्थिक वर्षात कंपनीचा इपीएस 231 रुपये असू शकतो. स्टॉक सध्या 22x च्या FY26e पीईवर ट्रेड करत आहे, ज्यामुळे त्याचे व्हॅल्यूएशन आकर्षक आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT