Microsoft Windows Crash Stock Market Sakal
Share Market

Microsoft Windows Crash: मायक्रोसॉफ्टमुळे जगात गोंधळ! बँकिंग-स्टॉक मार्केटवर मोठा परिणाम; कोणत्या सेवा पडल्या ठप्प?

Microsoft Windows Crash Stock Market: मायक्रोसॉफ्ट सिक्युरिटी सिस्टीममधील तांत्रिक समस्येमुळे मुंबईपासून बर्लिनपर्यंत एअरलाइन्सपासून बँकिंग आणि स्टॉक एक्स्चेंजपर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम झाला आहे.

राहुल शेळके

Microsoft Windows Crash: मायक्रोसॉफ्ट सिक्युरिटी सिस्टीममधील तांत्रिक समस्येमुळे मुंबईपासून बर्लिनपर्यंत, एअरलाइन्सपासून बँकिंग आणि स्टॉक एक्स्चेंजपर्यंत सर्व सेवांवर परिणाम झाला आहे. मायक्रोसॉफ्टमधील समस्येमुळे मुंबई विमानतळासह जगभरातील विमानतळांवर उड्डाणे ठप्प झाली आहेत.

तांत्रिक अडचणींमुळे विमानतळच नव्हे तर बाजारपेठा, बँका, शेअर बाजार सर्वच ठप्प झाले आहेत. त्याचबरोबर मायक्रोसॉफ्टचेही यामुळे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये 0.78 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

भारतात मायक्रोसॉफ्टच्या अडचणींमुळे मुंबई विमानतळावर चेक-इन यंत्रणा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना अडचणी येत आहेत. त्यामुळे स्पाइसजेट, इंडिगो, एअर इंडिया, आकासा या सर्व विमान कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.

भारतातील व्यापारावर परिणाम

मायक्रोसॉफ्टमधील अडचणीमुळे दलाल स्ट्रीटवरील व्यापारीही त्रस्त झाले आहेत. माहितीनुसार, भारतातील अनेक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर ट्रेडिंग करताना समस्या येत आहेत. अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी ब्रोकरेज फर्म्स 5Paisa आणि IIFL सिक्युरिटीजने ग्राहकांना सांगितले आहे की मायक्रोसॉफ्टच्या समस्येमुळे त्यांच्या सिस्टमवर परिणाम झाला आहे.

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे इस्रायलच्या केंद्रीय बँकिंग सेवांवरही परिणाम होत आहे. स्पेनमध्येही हवाई सेवेवर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण जगाची बँकिंग व्यवस्था हळूहळू प्रभावित होत आहे. या गोंधळाचा परिणाम ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिन्यांवरही होताना दिसत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम डेन्मार्कपासून नेदरलँडपर्यंत दिसून येत आहे.

इंडिगो, स्पाइसजेट आणि आकासा एअर या विमान कंपन्यांना फटका बसला आहे. फ्लाइट बुकिंग आणि चेक इन या सेवांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. .

मायक्रोसॉफ्ट क्लाउडमधील या त्रुटीमुळे जगभरातील पेमेंट गेटवे प्रणाली कोलमडली आहे. याशिवाय रेल्वे सेवा आणि सुपर मार्केटवरही परिणाम झाला आहे. या बंदमुळे बाजार, शेअर बाजार, बँकांसह अनेक सेवांवर परिणाम झाला. अँगल वन, 5 पैसे आणि ग्रोव सारख्या ब्रोकिंग प्लॅटफॉर्मवरही गुंतवणूकदारांना समस्यांचा सामना करावा लागला.

नेमकं झालं काय?

गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अनेक लहान-मोठ्या कंपन्यांचे लॅपटॉप आणि संगणकांवर अचानक निळी स्क्रीन आली आणि ते बंद पडले. बऱ्याच युजर्सनी ऑपरेटिंग सिस्टम रीस्टार्ट केली तरीही ती काही काळानंतर बंद होत होती.

याआधी युजर्सना अशी समस्या अधूनमधून भेडसावत असे, पण आज त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. काही वेळातच सोशल मीडियावर मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरबद्दल तक्रारींचा पूर आला.

जवळपास सर्व सेवांवर परिणाम

मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे जगातील जवळपास सर्व सेवांवर परिणाम झाला. एमएस विंडोजसह अनेक सेवांमध्ये गडबड दिसून आली, ज्याबद्दल लोकांनी सोशल मीडियावर तक्रार केली. MS-Window व्यतिरिक्त, Microsoft Teams, Azure, MS-Store आणि क्लाउड सेवांमध्ये समस्यांचा सामना करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT