MRF Share Price Crosses Rs 1-lakh Mark Sakal
Share Market

अंबानी, टाटा, बिर्ला सगळे कंपनीपुढे पडले फिके! 1 शेयर झाला 1 लाखाचा, असा आहे कंपनीचा थक्क करणारा प्रवास

एकेकाळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होता

राहुल शेळके

MRF Share Price Crosses Rs 1-lakh Mark:  MRF टायर्सचे नाव तुम्ही ऐकले असेलच. एकेकाळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर होता आणि प्रत्येक सामन्यात तो MRF ची बॅट (MRF Bat) घेऊन मैदानात जाताना दिसत होता.

आज विराट कोहली (Virat KOhali) त्याचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. MRF ही एक भारतीय बहुराष्ट्रीय टायर निर्मिती कंपनी आहे, जी एकेकाळी मद्रास रबर फॅक्टरी म्हणून ओळखली जात होती.

कंपनी टायर, ट्रेड्स, ट्यूब, कन्व्हेयर बेल्ट, पेंट्स, खेळणी, तसेच क्रीडासाहित्य आणि मोटर स्पोर्ट्सच्या निर्मितीमध्ये देखील आहे. एवढेच नाही तर एमआरएफ पेस फाउंडेशन आणि एमआरएफ इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हर डेव्हलपमेंटदेखील चालवते.

एवढा मोठा व्यवसाय असलेल्या एमआरएफने मुलांसाठी फुगे बनवण्याच्या व्यावसायापासून सुरुवात केली होती. ( Journey OF MRF Tyres )

असा आहे MRF चा थक्क करणारा प्रवास:

MRF म्हणजे मद्रास रबर फॅक्टरी. 1946 मध्ये फुगा विकणाऱ्या व्यक्तीने त्याचा पाया घातला. के. एम. मामेन मपिल्लई (K.M. Mammen Mappillai) पूर्वी फुगे विकायचे. केरळमधील एका ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेले मपिल्लई यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते.

स्वातंत्र्यलढ्यात त्यांना अटक झाली. वडील तुरुंगात गेल्यानंतर संपूर्ण जबाबदारी मपिल्लई यांच्या खांद्यावर आली. घरात आठ भाऊ-बहीण होते.

कुटुंब चालवण्यासाठी त्यांनी रस्त्यावर फुगे विकायला सुरुवात केली. 6 वर्षे फुगे विकल्यानंतर 1946 मध्ये त्यांनी रबरचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

1940 च्या दशकात रबर बलून कारखाना म्हणून 14000 रुपयांच्या निधीतून झाली. हा बलून कारखाना 1946 मध्ये मद्रासच्या तिरुवोट्टीयुर येथील शेडमध्ये मपिल्लई यांनी सुरू केला होता.

1949 पर्यंत, कंपनीने लेटेक्स कास्ट खेळणी, हातमोजे आणि गर्भनिरोधक बनवण्यास सुरुवात केली. त्याच बरोबर मद्रासच्या थंबू चेट्टी स्ट्रीटवर त्याचे पहिले कार्यालय सुरू केले. (Madras Rubber Factory)

1952 मध्ये सुरू झाले रबर उत्पादनाचा व्यापार:

1952 मध्ये या कारखान्यात ट्रेड रबरचे उत्पादन सुरू झाले आणि येथूनच त्याचा गौरवशाली इतिहासही लिहिला गेला. 4 वर्षांच्या आत म्हणजे 1956 पर्यंत, MRF 50% मार्केट शेअरसह भारतातील ट्रेड रबर मार्केटचा राजा बनला होता.

मद्रास रबर फॅक्टरी लिमिटेड हे नाव नोव्हेंबर 1960 मध्ये अस्तित्वात आले. 1961 मध्ये, MRF सार्वजनिक कंपनी बनली. यासोबतच कंपनीने मॅन्सफिल्ड टायर आणि अमेरिकेच्या रबर कंपनीसोबत तांत्रिक सहकार्यही स्थापन केले.

मॅपिल्लई यांनी मग मुलांसाठी खेळणी बनवण्यास सुरुवात केली. 1956 पर्यंत त्यांची कंपनी रबर व्यवसायात मोठी कंपनी बनली होती.

हळूहळू टायर उद्योगाकडे त्यांचा कल वाढला. सन 1979 पर्यंत कंपनीचा व्यवसाय संपूर्ण भारतात आणि परदेशात पसरला होता. (MRF Share Price Crosses Rs 1-lakh Mark)

1960 च्या दशकात निर्यातील सुरूवात:

1964 मध्ये, MRF ने बेरूत येथे आपले कार्यालय उघडले, जे परदेशात टायर निर्यात करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल होते. याच वर्षी 'MRF Muscleman' अस्तित्वात आले.

1967 मध्ये, FRF ही US ला टायर निर्यात करणारी पहिली भारतीय कंपनी बनली, ज्याला टायर तंत्रज्ञानाचा जनक म्हणून ओळखले जाते.

यानंतर, 1970 मध्ये, कंपनीने कोट्टायममध्ये आपला दुसरा प्लांट उघडला. कंपनीचा तिसरा प्लांट 1971 मध्ये गोव्यात आणि चौथा प्लांट 1972 मध्ये अरक्कोनम येथे सुरू झाला.

1973 मध्ये, MRF ने नायलॉन पॅसेंजर कार टायर्सची उत्पादन आणि विक्री सुरू केली. 1978 मध्ये, कंपनीने हेवी ड्युटी ट्रकसाठी MRF Superlug-78 टायरची निर्मिती केली. त्यानंतरच्या वर्षांमध्ये, उत्पादन देशात सर्वाधिक विक्री होणारे ट्रक टायर बनले.

मॅन्सफिल्ड टायर अँड रबर कंपनीने 1979 मध्ये MRF मधील आपला हिस्सा विकला आणि नंतर एका वर्षाच्या आत कंपनीचे नाव MRF असे करण्यात आले. 1985 मध्ये कंपनीने दुचाकी वाहनांसाठी निलोग्रिप टायर लाँच केले.

काही महत्त्वाची वर्षे:

  • 1988: MRF पेश फाउंडेशनच्या स्थापनेसह क्रीडा क्षेत्रात प्रवेश.

  • 1989: जगातील सर्वात मोठी खेळणी कंपनी हॅस्ब्रो इंटरनॅशनल यूएसए सोबत सहकार्य केले आणि फनस्कूल इंडिया लाँच केले.

  • त्याच वर्षी, कंपनीने पॉलीयुरेथेन पेंट फॉर्म्युलेशन तयार करण्यासाठी व्हेपोक्युअर ऑस्ट्रेलियाशी करार केला. तसेच MUSCLEFLEX कन्व्हेयर आणि लिफ्ट बेल्टिंगसाठी पिरेलीशी हातमिळवणी केली.

  • 1993: केएम मैम्मेन मॅपिल्लई यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले दक्षिण भारतीय उद्योगपती ठरले.

  • 1996: MRF ने पुद्दुचेरीमध्ये रेडियल्सच्या उत्पादनासाठी पूर्णपणे समर्पित एक विशेष कारखाना सुरू केला. 1997 मध्ये, कंपनीने प्रथम F3 कारमध्ये प्रवेश केला. त्याच वर्षी, कंपनीचे पहिले टायर्स आणि सर्व्हिस फ्रँचायझी स्टोअर देशात उघडले.

  • 2007: कंपनीने 1 बिलियन डॉलर टर्नओव्हरचा टप्पा ओलांडला. त्याच वर्षी, कंपनीने पहिले इको-फ्रेंडली टायर्स लाँच केले.

  • 2011 मध्ये, कंपनीचा 7 वा प्लांट अंकनपल्ली येथे सुरू झाला आणि कंपनीने 2 अब्ज डॉलर्सची उलाढाल केली. कंपनीचा 8वा प्लांट यावर्षी त्रिची येथे सुरू झाला. 9वा प्लांट 2012 मध्ये त्रिचीमध्येच सुरू झाला.

  • 2013: सुखोई 30 MKI फायटर जेटसाठी MRF चे एरोची निवड झाली.

  • 2015: MRF ला Forbes India च्या सुपर 50 भारतातील सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीत पहिले स्थान मिळाले आहे. कंपनीने 2017 मध्ये या यादीतही चांगली रँकिंग मिळवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT