Muhurat Trading 2023 Do investors benefit on diwali Muhurat Trading here is the record of 10 years  Sakal
Share Market

Muhurat Trading 2023: मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांना फायदा होतो का? असा आहे 10 वर्षांचा रेकॉर्ड

Muhurat Trading 2023: गेल्या 10 वर्षात शेअर बाजार कसा होता?

राहुल शेळके

Muhurat Trading 2023: दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भारतीय शेअर बाजार 'मुहूर्त ट्रेडिंग'साठी संध्याकाळी एक तासाचे विशेष ट्रेडिंग सत्र उघडणार आहे. ही एक तासाची वेळ शेअर्समध्ये गुंतवणुकीसाठी शुभ मानली जाते.

अनेक गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की यामुळे भरभराट होऊ शकते. दिवाळीला बाजारपेठा बंद असल्याने, BSE आणि NSE दोन्ही मुहूर्त ट्रेडिंग सत्र रविवारी 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:00 ते 7:15 दरम्यान होतील.

दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात उत्साही वातावरण असते. कारण व्यापाराची वेळ खूपच कमी असली तरी सामान्यत: शेअर बाजार तेजीत असतो. 2008 पासून गेल्या 15 वर्षात 12 मुहूर्त ट्रेडिंग सत्रात तेजीसह व्यवहार झाला.

गेल्या 10 वर्षात शेअर बाजार कसा होता?

गेल्या 10 वर्षात, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी दिवाळीच्या मुहूर्तावर 8 वेळा नफा कमावला आहे. या 8 वर्षांत सेन्सेक्स आणि निफ्टीने चांगला परतावा दिला आहे. फक्त दोन वेळा शेअर बाजाराने गुंतवणूकदारांचे नुकसान केले होते. गेल्या वर्षीची दिवाळी अलिकडच्या वर्षांतील सर्वात चांगली होती. 2016 आणि 2017 मध्ये सेन्सेक्समध्ये घसरण झाली होती. 2018 ते 2022 या कालावधीत गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे.

तज्ञ काय म्हणतात?

MasterTrust चे MD हरजीत सिंग अरोरा सांगतात की दिवाळीत ट्रेडिंग दरम्यान बाजारात खूप चढ-उतार असतात. अशा परिस्थितीत यापैकी कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी संशोधन करणे अत्यंत आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी पुरेशी तरलता असलेले स्टॉक शोधले पाहिजेत.

शेअर बाजाराचा मूड कसा असेल?

स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे व्यवस्थापकीय संचालक सुनील न्याती यांच्या मते, भारतीय शेअर्सबाबत त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. अमेरिकेकडून व्याजदर शिगेला पोहोचतील असे संकेत मिळत आहेत, यामुळे बाजारालाही आधार मिळेल.

सुनील म्हणाले की, येत्या काही महिन्यांत सोने आणि इक्विटी बाजार दोन्ही चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. जर अमेरिकेची अर्थव्यवस्था 2024 मध्ये मंदीत गेली तर सोन्याची कामगिरी चांगली होऊ शकते.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT