Multibagger Ashoka Metcast Stock gives 500 percent return in 5 year  Sakal
Share Market

Multibagger Stock: तुम्ही असा मल्टीबॅगर पाहिला नसेल; 5 वर्षांत दिला 'इतका' परतावा, आता केमिकल व्यवसायात प्रवेश करणार

राहुल शेळके

Multibagger Stocks: शेअर बाजारात कधी कोणते शेअर्स तुम्हाला नफा मिळवून देतील याचा काही नेम नाही. कधी कधी छोट्या कंपन्यांचे शेअर्स देखील मल्टीबॅगर्स बनतात. अशात मेटल कंपनी अशोका मेटकास्टचाही (Ashoka Metcast) मल्टीबॅगर स्टॉकच्या लिस्टमध्ये समावेश होतो. या कंपनीच्या शेअरने पाच वर्षांत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. हा परतावा 100-200% नाही तर 500% पेक्षा जास्त आहे. (Multibagger Ashoka Metcast Stock gives 500 percent return in 5 year)

मेटल कंपनी अशोका मेटकास्ट स्टील क्षेत्रात कार्यरत आहे, तर आता कंपनी केमिकल व्यवसायात उतरण्याच्या तयारीचा विचार करत आहे. यासाठी कंपनी बाजारातील संभाव्य जोखीम, फायदे, धोरण आखत आहे. दरम्यान, कंपनीच्या शेअर्समध्येही वाढ झाली आहे. (Ashoka Metcast Limited Potential Entry Into The Chemical Business)

पाच वर्षांपूर्वी 8 फेब्रुवारी 2019 रोजी अशोका मेटकास्टच्या शेअरची किंमत सुमारे 4 रुपये होती. यानंतर, स्टॉकमध्ये थोडीशी घसरण झाली आणि ऑगस्ट 2019 ते डिसेंबर 2020 पर्यंत कंपनीचे शेअर्स 2-3 रुपयांच्या दरम्यान व्यवहार करत राहिले. पण, तेव्हापासून शेअरच्या किंमतीत वाढ झाली आहे आणि शेअर दरवर्षी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देत आहे.

मे 2022 मध्ये शेअरची किंमत 10 रुपयांपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर मे 2023 पर्यंत शेअरची किंमत दुप्पट होऊन 20 रुपये झाली. सध्या हा शेअर 26.49 रुपयांवर ट्रेड करत आहे. यासोबतच शेअरच्या किंमतीत पाच वर्षांत 22.17 रुपयांनी वाढ झाली आहे, म्हणजेच गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना शेअरमधून 513.19 टक्के परतावा मिळाला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray On RSS : "एखाद्या संघटनेने १०० वर्ष काम करावं हे सोपं नाही...", राज ठाकरेंकडून 'आरएसएस'चं तोंडभरून कौतुक

Latest Maharashtra News Updates : गुजरात दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना पीएम मोदींकडून मदतीचा हात

IND vs BAN : टीम इंडिया नाणेफेक जिंकून बांगलादेशला मालिकेतून व्हाईटवॉश करण्यासाठी सज्ज

Crime: 'माझ्या मुलीला संपव', महिलेने प्रियकराला दिली सुपारी, योजना समजताच तरुणीनं मारेकऱ्यालाच प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर आईलाच मारलं

Sulbha Khodke: काँग्रेसकडून आमदार सुलभा खोडकेंचं निलंबन; उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT