Multibagger Stock Atul Auto 73 percent profit for investors in last 6 months  Sakal
Share Market

Multibagger Stock: गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 73 टक्के नफा; तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर?

राहुल शेळके

Multibagger Stock: शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर तुम्ही अतुल ऑटो शेअर्सचा (Atul Auto) विचार करु शकता. या ऑटो स्टॉकने कमी कालावधीत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

गेल्या शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 0.78 टक्क्यांनी वाढून 617.15 रुपयांवर बंद झाले. कंपनीचे मार्केट कॅप 1,712.67 कोटी आहे. या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 683.30 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 239.80 रुपये आहे.

गेल्या काही आर्थिक वर्षांमध्ये कंपनीने ऑपरेटिंग रेव्हेन्यू आर्थिक वर्ष 21-22 मधील 315.42 कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष 22-23 मध्ये 513.12 कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे. शिवाय प्रॉफिट आफ्टर टॅक्स याच कालावधीत 25.48 कोटीच्या तोट्यावरून 3.13 कोटीच्या नफ्यात बदलला.

गेल्या एका महिन्यात अतुल ऑटोचे शेअर्स सुमारे 6 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या 6 महिन्यांत त्याच्या गुंतवणूकदारांना 73 टक्के इतका चांगला नफा मिळाला आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 112 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांनी 122 टक्के नफा कमावला आहे.

सप्टेंबर 2023 ला संपलेल्या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्न डेटानुसार कंपनीच्या प्रमोटर्सकडे 42.73 टक्के हिस्सा आहे. त्याच वेळी, पब्लिक इनवेस्टर्सकडे कंपनीमध्ये 56.41 टक्के हिस्सा आहे. अतुल ऑटो लिमिटेड ही भारतातील ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी आहे जी देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत तीन-चाकी व्यावसायिक वाहनांचे उत्पादन आणि विक्री करते.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळी दाखल

IND vs BAN 1st Test : रोहितकडून Mohammad Siraj वर अन्याय, नेटिझन्स नाराज; पण, बांगलादेशला दिसले 'आकाश' Video

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

SCROLL FOR NEXT