Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये पैसे कमावयचे असतील तर चांगल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक अतिशय गरजेची आहे. सध्या डिफेन्स स्टॉक अवांटेल लिमिटेडच्या (Avantel Ltd) शेअर्सवर फोकस आहे. कारण कमी कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे.
नुकतीच या शेअर्समध्ये सुमारे 10 टक्क्यांची वाढ झाली आणि तो सध्या 128.60 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्सची घोषणा केली होती, ज्या अंतर्गत त्यांनी 24 नोव्हेंबरला एक्स बोनस ट्रेड केला आहे.
कंपनीने बोनस इश्यूद्वारे शेअरधारकांना प्रत्येकी 2 रुपयांचे 16 कोटी 21 लाख 79 हजार 720 इक्विटी शेअर्स जारी केले आहेत. ज्या गुंतवणूकदारांची नावे 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत रेकॉर्डमध्ये होती त्यांना हे शेअर्स जारी करण्यात आले आहेत.
या अंतर्गत, कंपनी प्रत्येकी 1 शेअरसाठी 2 रुपये फेस व्हॅल्यूवर दोन नवीन इक्विटी शेअर जारी करेल. मागील वर्षी देखील कंपनीने 3:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्सचे वाटप केले होते.
ट्रेंडलाइन डेटानुसार, कंपनीने जून 2001 पासून आतापर्यंत 20 वेळा डिव्हिडेंड जारी केला आहे. स्टॉकने गेल्या 12 महिन्यांत प्रति शेअर 1 रुपये डिव्हिडेंड जाहीर केला. त्याचे बोनस, स्प्लिट्स आणि डिव्हिडेंड ऍडजस्ट करून, स्टॉकचे डिव्हिडेंड यील्ड सध्याच्या बाजारभावानुसार 0.05% आहे.
गेल्या एका महिन्यात अवांटेलने आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत या शेअरमध्ये 292 टक्के इतकी प्रचंड वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत हा शेअर 400 टक्के वाढला आहे. गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 341 टक्के इतका मोठा नफा मिळाला आहे.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.