Multibagger Stock Sakal
Share Market

Multibagger Stock: 'या' शेअरने गुंतवणूकदारांना बनवले कोट्यधीश, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

Multibagger Stock: शेअर बाजारात मल्टीबॅगर स्टॉक्सने कायमच आपल्या गुंतवणुकदारांना दमदार परतावा दिला आहे. अशात तुम्हीही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्सच्या (DSSL) शेअर्सवर लक्ष ठेवू शकता.

राहुल शेळके

Multibagger Stock: शेअर बाजारात मल्टीबॅगर स्टॉक्सने कायमच आपल्या गुंतवणुकदारांना दमदार परतावा दिला आहे. अशात तुम्हीही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्सच्या (DSSL) शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. या शेअरने कमी काळात आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे.

सध्या हा शेअर 688.35 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीला नुकतीच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडकडून (BHEL) मोठी ऑर्डर मिळाली आहे. या मायक्रो कॅप कंपनीचे मार्केट कॅप 873.73 कोटी आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 847 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 283.30 रुपये आहे.

डायनाकन्स सिस्टम्स अँड सॉल्यूशन लिमिटेडही एक आघाडीची आयटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे जी सिस्टम इंटिग्रेशन, नेटवर्किंग सोल्यूशन्स, फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस, सिक्युरिटी सॉल्यूशन आणि सॉफ्टवेअर सर्व्हिसेस देते.

डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्सला अलीकडे बीएचईएलकडून 137 कोटीची नवीन ऑर्डर मिळाली आहे. या कॉन्ट्रॅक्टचा कालावधी 5 वर्षांचा आहे.

कंपनीला संपूर्ण भारतात ऑफिस/फॅक्टरीसाठी डेस्कटॉप, वर्कस्टेशन्स, एलईडी प्रोजेक्टर आणि यूपीएससह हाय परफॉर्मंसच्या डिजिटल वर्कप्लेस सोल्यूशन्ससाठी ही ऑर्डर मिळाल्याचे कंपनीने म्हटले आहे. बीएचइएलही सर्वात मोठी सरकारी पॉवर जनरेशन इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर कंपनी आहे.

गेल्या 6 महिन्यांत डायनाकॉन्स सिस्टम्स आणि सोल्युशन्सचे शेअर्स 28 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात 60 टक्के परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षांत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 985 टक्के इतका चांगला परतावा दिला आहे.

गेल्या 10 वर्षात या शेअर्सने 22375 टक्क्यांचा बंपर परतावा दिला आहे. जानेवारी 2014 मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत 3.07 रुपये होती, जी आज 690 रुपये झाली आहे. याचा अर्थ गेल्या 10 वर्षात गुंतवणूकदारांच्या पैशात सुमारे 225 पट वाढ झाली आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी त्यात 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमची रक्कम 2 कोटी 25 लाख रुपये झाली असती.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT