Multibagger Stock: शेअर बाजारात कधी कोणता शेअर तुमचे नशीब बदलेल काही सांगता येत नाही. असाच एक शेअर आहे एसजी मार्ट लिमिटेडचा (SG Mart Ltd). या शेअरने अवघ्या 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.
3 वर्षात या शेअरची किंमत वाढली आहे. 100 रुपयांवरून हा शेअर चक्क 11,000 रुपयांपर्यंत वाढला. या 3 वर्षांमध्ये ज्या लोकांनी या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती ते आज श्रीमंत झाले आहेत.
शुक्रवारी 12 डिसेंबरला बीएसईवर एसजी मार्टचे शेअर्स 2 टक्क्यांनी वाढून 11,371 रुपयांवर बंद झाले. पण, 3 वर्षांपूर्वी त्याचे शेअर्स बीएसईवर अवघ्या 95 रुपयांना मिळत होते. अशाप्रकारे गेल्या 3 वर्षांत या शेअरची किंमत सुमारे 12,000 टक्क्यांनी वाढली आहे.
एखाद्या गुंतवणूकदाराने 3 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 12,000 टक्क्यांनी वाढून सुमारे 1.2 कोटी झाले असते. म्हणजेच, तो गुंतवणूकदार या 3 वर्षात कोट्यधीश झाला असता.
एसजी मार्टच्या शेअर्सची अलीकडची कामगिरीही दमदार आहे. गेल्या एका वर्षात, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 2,500 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. फक्त गेल्या एका महिन्यात शेअरच्या किंमतीत सुमारे 51 टक्क्यांची वाढ झाली आहे.
डिसेंबर तिमाहीत, कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 47,903% वाढून 748.26 कोटी झाला आहे, जो एका वर्षापुर्वी याच तिमाहीत केवळ 1.56 कोटी होता. कंपनीचा निव्वळ नफा 17.19 कोटी होता.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.