Multibagger Stock: सनफ्लॅग आयर्न अँड स्टील (Sunflag Iron & Steel) कंपनीच्या शेअर्समधील वाढीमुळे गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळाला आहे. नुकतीच इंट्रा-डेमध्ये 15 टक्क्यांहून जास्त तेजीसह त्यांनी उच्चांक गाठला.
लाँग टर्मचा विचार केल्यास कंपनीच्या शेअर्सने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे 1 कोटी रुपये केलेत. मागच्या एका वर्षात त्यांनी अडीच पटीने संपत्तीत भर घातली आहे. सध्या हा शेअर 190.50 रुपयांवर ट्रेड करत आहे.
सनफ्लॅग आयर्नचे शेअर्स 26 जुलै 2001 रोजी केवळ 1.90 रुपयांना मिळत होते. मात्र आता ते 190.50 रुपयांवर आहेत. म्हणजेच 22 वर्षांत गुंतवणूकदारांच्या भांडवलात 9926 टक्क्यांहून अधिक वाढ झाली.
गेल्या वर्षी 6 जुलै 2022 रोजी तो 77.70 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता. यानंतर खरेदी वाढली आणि एका वर्षात ती 153 टक्क्यांनी वाढून 196.90 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. मात्र, प्रॉफिट बुकींगमुळे तो या उच्चांकावरून 3 टक्क्यांहून अधिक घसरून बंद झाला.
सनफ्लॅग आयर्न अँड स्टील ही सनफ्लॅग ग्रुप कंपनी आहे. कंपनी स्टील, सिंथेटिक धागे आणि न विणलेल्या कापडाचे व्यवसाय जगभर पसरलेले आहेत.
सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनी उच्च दर्जाच्या स्टील प्रॉडक्ट्सचे प्लांट्स चालवते. कंपनी कमी सामान आणि कमी गॅससह स्टील उत्पादने तयार करते, यासाठी त्यांनी जापानच्या डेडो स्टीलकडून क्लीन स्टीलची टेकनिक मिळवली आहे.
मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीचा नफा वार्षिक आधारावर 40.68 कोटी रुपयांवरून 39.95 कोटींवर घसरला. पण, या कालावधीत महसूल 648.98 कोटी रुपयांवरून 836.97 कोटी रुपयांवर गेला.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.