Share Market Sakal
Share Market

Multibagger Stock Updates: 7 वर्षात गुंतववणूकदार झाले कोट्यधीश, कोणता आहे 'हा' शेअर?

शिल्पा गुजर

Multibagger Stock Updates: शेअर मार्केटमध्ये योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. अशात तुम्ही मल्टीबॅगर स्टॉक्स शोधत असाल, तर तुम्ही आदित्य व्हिजनचा (Aditya Vision) विचार करु शकता.

या कंपनीचे मुख्यालय बिहारमध्ये आहे. आदित्य व्हिजनच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना केवळ 7 वर्षात कोट्यधीश बनवले आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सने सुमारे 12,000% परतावा दिला आहे.

सध्या आदित्य व्हिजनचे शेअर्स 1,845 रुपयांवर ट्रेड करत आहेत. सुमारे 2,220 कोटीचे मार्केट कॅप असलेली कंपनी बिहार आणि झारखंडमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री करते.

आदित्य व्हिजनच्या शेअरची 7 वर्षांपूर्वी 16 डिसेंबर 2016 रोजी किंमत फक्त 15.30 रुपये होती. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 11,958.82 टक्क्यांची वाढ झाली आहे.

याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने या कंपनीच्या शेअर्समध्ये 7 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1.20 कोटी झाले असते.

आदित्य व्हिजनचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 34.49% वाढले आहेत. त्याच वेळी गेल्या एका वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 132.05% परतावा दिला आहे.

शेअर बाजारातील दिग्गज ज्येष्ठ गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनीही या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. मार्च तिमाहीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, त्यांची या कंपनीत सुमारे 1.1% भागीदारी आहे. सध्याच्या बाजारभावानुसार या स्टेकची किंमत सुमारे 24.8 कोटी रुपये आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Amit Thackeray: अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला; पण मुंबईतला नाही तर...

Jarange Health Update: उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांनी केल्या कडक शब्दांत सूचना

Latest Marathi News Updates : भाजपशासित सर्व राज्यांमध्ये प्रसादाची तपासणी करावी: मंत्री प्रियांक खर्गे

IND vs BAN: अ‍ॅक्शन रिप्ले! Rohit Sharma दुसऱ्या डावातही फसला; एकाच पद्धतीने पुन्हा OUT झाला, जैस्वालही गंडला

Share Market Closing: आठवड्याच्या शेवटी शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्सने 1400 अंकांनी वाढला, निफ्टी 25,800च्या वर

SCROLL FOR NEXT