share market sakal
Share Market

Multibagger Stock: 'या' शेअरमुळे केवळ 7 वर्षात गुंतवणूकदार झाले कोट्यधीश, तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहे का?

शिल्पा गुजर

Multibagger Stock Updates: लान्सर कंटेनर्स लाईन्सच्या (Lancer Containers Lines) शेअर्सने गेल्या 7 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना दमदार परतावा दिला आहे. एवढ्या कमी कालावधीत या शेअरने 10,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

लान्सर कंटेनर्सची दुबईस्थित उपकंपनी जहाज व्यवसायासाठी दुबईस्थित काही संस्थांसोबत संयुक्त उपक्रम करत असल्याचे कंपनीने नुकतेच उघड केले. यामुळे हा मल्टीबॅगर स्टॉक पुन्हा एकदा फोकसमध्ये आला आहे.

लान्सर कंटेनर्स लाईन्स लिमिटेड भारत आणि परदेशात शिपिंग आणि लॉजिस्टिक सेवा देते. कंपनीचे मार्केट कॅपिटल 900 कोटी आहे. लान्सर कंटेनर्सचे शेअर्स सध्या बीएसईवर 145 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

पण सुमारे 7 वर्षांपूर्वी, 3 एप्रिल 2016 रोजी या शेअरची किंमत फक्त 1.31 रुपये होती. तेव्हापासून या शेअरची किंमत सुमारे 10,968.70 टक्क्यांनी वाढली आहे.

याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने 7 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक आजपर्यंत विकली नसती, तर आज त्या 1 लाखाचे 1.1 कोटी झाले असते.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये लान्सर कंटेनर्सचा महसूल 30.37 टक्क्यांनी वाढून 837 कोटी रुपये होता. त्याच वेळी, आर्थिक वर्ष 2023 मध्ये त्याचा निव्वळ नफा 54 कोटी रुपये होता. कंपनीचे जून तिमाहीचे निकाल येणे बाकी आहे. निकालानंतर यात आणखी तेजीचा विश्वास शेअर मार्केट एक्सपर्ट वर्तवत आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Accident: भीषण दुर्घटना! जालना-वडीगोद्री मार्गावर एसटी बस अन् ट्रकची टक्कर, ५ जणांचा मृत्यू

ही वाट्टेल तशी खेळते आणि... मीरा जग्गनाथने अंकितावर साधला निशाणा; पण नेटकऱ्यांनी घेतली तिचीच शाळा

ENG vs AUS 1st ODI : २५ चेंडूंत ११० धावा! Travis Head ला रोखणं झालंय अवघड; ख्रिस गेल स्टाईल सेलिब्रेशन

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; निफ्टी 25,500च्या वर, मिडकॅप निर्देशांक तेजीत

Assembly Election : राजू शेट्टी, संभाजीराजेंसमोर 'होमपीच'वरच आव्हान; उमेदवार ठरवताना तिसऱ्या आघाडीची लागणार कसोटी

SCROLL FOR NEXT