Share Market Sakal
Share Market

Multibagger Stock Updates: 2 वर्षात 1 लाखाचे झाले 5,00,000, 'या' शेअरने गुंतवणूकदारांना दिला दमदार परतावा

गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 29 टक्के परतावा दिला आहे.

शिल्पा गुजर

Multibagger Stock Updates: शेअर बाजारात मल्टीबॅगर स्टॉक कमी वेळेत गुंतवणुकदारांना दमदार नफा मिळवून देतात. तुम्हीही असेच शेअर्स शोधत असाल तर एफएमसीजी सेक्टरमधील कंपनी मिष्टान्न फूृड्सच्या (Mishtann Foods) शेअर्सवर लक्ष ठेवू शकता.

कोरोनानंतर या स्मॉल कॅप स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला. गेल्या शुक्रवारी या शेअरमध्ये 0.09 टक्क्यांची किंचित घसरण झाली आणि तो 11.11 रुपयांवर बंद झाला.

स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 12.55 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 7.09 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 1,111 कोटीवर गेले आहे.

नोमुरा सिंगापूर-समर्थित या एफएमसीजी स्टॉकने आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीसाठी मजबूत निकाल जाहीर केले. या कालावधीत कंपनीच्या कामकाजातून मिळणारा महसूल 10 टक्क्यांनी वाढला असून तो 168.89 कोटी रुपये झाला आहे.

गेल्या वर्षी याच तिमाहीत हा आकडा 153.47 कोटी रुपये होता. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात अनेक उत्पादने लाँच केल्यामुळे ही वाढ झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

मिष्टान्न फूड्सच्या शेअर्सने गेल्या एका महिन्यात 10 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत त्यात 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 29 टक्के परतावा दिला आहे. इतकेच नाही तर गेल्या जवळपास दोन वर्षांत गुंतवणूकदारांना 405 टक्क्यांचा बंपर नफा मिळाला आहे.

म्हणजेच या काळात गुंतवणूकदारांच्या पैशात 5 पटीने वाढ झाली आहे. जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 5 लाख झाले असते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

Women’s Asian Champions Trophy: भारतीय महिलांचे वर्चस्व कायम; चीनवर ३-० मात करत ग्रुपमध्ये अव्वल

Paranda Assembly Election : मतदानाच्या दिवशी कोणीही 'चप्पल' घालून प्रवेश केल्यास कारवाईची मागणी; अपक्ष उमेदवाराची अनोखी तक्रार

SCROLL FOR NEXT