Multibagger Stock Waaree Technologies share jump 1 lakh became 51 lakh in 3 years  Sakal
Share Market

Multibagger Stock: 3 वर्षात गुंतवणूकदार झाले मालामाल! 1 लाखाचे झाले 51 लाख; कोणता आहे हा शेअर?

राहुल शेळके

Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये मल्टीबॅगर स्टॉकमधील गुंतवणूक तुम्हाला कायम कमी वेळेत बंपर नफा कमवून देते. वारी टेक्नोलॉजीज (Waaree Technologies) हा असाच एक स्टॉक आहे, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे.

नुकतेच या शेअरमध्ये 5 टक्के अपर सर्किट लागले आणि हा शेअर 874.15 रुपयांच्या किंमतीवर बंद झाला. जो 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. यासह कंपनीचे मार्केट कॅप 941.30 कोटी झाले आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांक 139.75 रुपये आहे.

वारी टेक्नॉलॉजीजचे एकूण उत्पन्न सप्टेंबर तिमाहीत 80 टक्क्यांनी वाढून 13.7 कोटी झाले आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत 7.6 कोटी होते. दरम्यान, सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीला 2 कोटींचा तोटा झाला, तर गेल्या वर्षी याच कालावधीत 15 लाखांचा नफा झाला होता.

गेल्या एका महिन्यात वारी टेकचे शेअर्स 88 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या 6 महिन्यांत 96 टक्के परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 455 टक्के बंपर नफा मिळाला आहे. इतकेच नाही तर गेल्या 3 वर्षात गुंतवणूकदारांना 5025 टक्के बंपर नफा मिळाला आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत 17.05 रुपये होती, ती आज 874.15 रुपये झाली आहे. म्हणजे सुमारे 3 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे 51 पटीने वाढले आहेत.

वारी टेक्नोलॉजीज लिमिटेड भारतात लिथियम बॅटरीचे उत्पादन आणि विक्री करते. कंपनी फोर्कलिफ्ट आणि ट्रॅक्शन सोल्यूशन्स, टेलिकॉम आणि एनर्जी स्टोरेज सिस्टम, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम आणि दुचाकी आणि तीन चाकी इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी बॅटरी पुरवते.

त्याची उत्पादने ई-सायकल, ई-फोर्कलिफ्ट, ई-रिक्षा, बॅटरी एनर्जी सिस्टम आणि टेलिकॉम यूपीएसमध्ये वापरली जातात. ही कंपनी ई-वाहनांमध्येही व्यापार करते आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड प्रोडक्टआणि सर्व्हिसेजही देते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT