Multibagger Stocks Gabriel share made crorepati now brokerage assign sale rating know reason  Sakal
Share Market

Multibagger Stocks: अडीच रुपयांच्या शेअरने बनवले कोट्यधीश, आता शेअर्स विक्रीचा तज्ज्ञांचा सल्ला, काय आहे कारण?

राहुल शेळके

Multibagger Stocks: राइड कंट्रोल प्रॉडक्ट्स बनवणारी कंपनी गॅब्रिएलचे (Gabriel) शेअर्स या महिन्याच्या सुरुवातीला विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते. पण आता ते या उच्चांकावरून 6 टक्क्यांपेक्षा जास्त खाली आलेत.

या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना लाँग टर्ममध्ये कोट्यधीश बनवले आहे, पण आता हे शेअर्स तातडीने विकण्याचा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ देत आहेत. हे शेअर्स सध्याच्या पातळीपासून किमान 13 टक्क्यांहून अधिक घसरू शकतात असे ब्रोकरेज फर्म जियोजित बीएनपी पारिबासचे म्हणणे आहे. बीएसईवर शेअर्सची किंमत सध्या 317.45 रुपये आहे. कंपनीची मार्केट कॅप 4,559 कोटी आहे.

20 सप्टेंबर 2002 रोजी गॅब्रिएलचे शेअर्स अवघ्या 2.60 रुपयांवर होते. आता ते 12,110 टक्क्यांनी वाढून 317.45 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच 21 वर्षात 82 हजारांच्या गुंतवणुकीवर त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

हा शेअर केवळ लाँग टर्मच नाही तर त्याने अतिशय कमी कालावधीतही चांगला परतावा दिला आहे. 28 मार्च 2023 रोजी त्याचा एक वर्षाचा नीचांक 129.50 रुपये होता. सुमारे 5 महिन्यांत, तो 161 टक्क्यांनी वाढला आणि 5 सप्टेंबर 2023 रोजी 338.35 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला.

गॅब्रिएल शॉक ऑब्जर्वर्स, फ्रंट फोर्क्स यांसारखी राइड कंट्रोल उत्पादने तयार करतो. ओला, एथर, टीव्हीए, एँपियर, आणि ओकिनावा या जवळपास सर्व टॉप मॉडेल्सशी त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म जिओजित बीएनबी परिबासच्या मते, सबसिडी कपात आणि पीएलआय (प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह) फायद्यांबाबत सरकारच्या कठोरतेमुळे इलेक्ट्रिक वाहनांची ऑर्डर कमी होऊ शकते. त्यामुळेच त्यांनी गॅब्रिएलचे टारगेट कमी करत 275 रुपयांवर आणले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: चीनमुळे भारतीय शेअर बाजारात कोसळतोय का? FII ने विकले 15,243 कोटी रुपयांचे शेअर्स

Ambabai Mandir : नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 1 लाख 34 हजारहून अधिक भाविकांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन

हिंदू धर्मीयांचा हिंसक असा उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी हिंदूंची माफी मागावी, मगच..; काय म्हणाले महाडिक?

Navratri 2024 : वरीचा भात, खिडचीची चव वाढवेल उपवासाची दाण्याची आमटी, रेसिपी पण लगेचच होणारी

MSRTC : तुळजापूरसाठी राज्यभरातून १ हजार २६५ बस, महामंडळाचे नियोजन; लालपरी सज्ज

SCROLL FOR NEXT