Multibagger Stock Sakal
Share Market

Multibagger Stocks: 5 वर्षात गुंतवणूकदार झाले मालामाल! 42 हजारांचे झाले 1 कोटी, तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर?

राहुल शेळके

Multibagger Stocks: शेअर बाजारात मायक्रो-कॅप शेअर्समधील गुंतवणूक अतिशय धोकादायक मानली जाते. पण यातील गुंतवणुकीने अनेकांना खुप कमी कालावधीत कोट्यधीश केले आहे हे ही तेवढेच खरे आहे. अशीच एक छोटी कंपनी प्राइम इंडस्ट्रीज (Prime Industires) आहे, ज्याने गेल्या 5 वर्षात केवळ काही हजारांच्या गुंतवणूकीवर आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

15 सप्टेंबरला बीएसईवर प्राइम इंडस्ट्रीजचे शेअर्स 4.98 टक्क्यांच्या वाढीसह 146.40 रुपयांवर बंद झाले. पण, सुमारे 5 वर्षांपूर्वी, प्राइम इंडस्ट्रीजचे शेअर्स बीएसईवर फक्त 0.60 रुपयांवर उपलब्ध होते. म्हणजेच गेल्या 5 वर्षांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 24,300 टक्के परतावा दिला आहे. कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप 229.17 कोटी रुपये आहे.

याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक आजपर्यंत कायम ठेवली असती, तर आज 1 लाखाचे 2.43 कोटी झाले असते. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्या वेळी फक्त 42,000 रुपये गुंतवले असते तर आज 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम झाली असती.

प्राइम इंडस्ट्रीजच्या शेअर्सने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 7.92 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत या शेअरची किंमत 1,584.70 टक्क्यांनी वाढली आहे. तर गेल्या एका वर्षात त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 1,991.43 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language: मी बिनशर्त पाठिंबा देण्याचं कारण...; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Bigg Boss Marathi Varsha Usgaonkar: वर्षा उसगावकर 'बिग बॉस'च्या घराबाहेर; टॉप 6 सदस्य झाले निश्चित

Marathi Language: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने नेमकं काय फायदा होणार? अभिजात भाषेचे निकष काय असतात? जाणून घ्या

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंगळवारी सोलापुरात! वचनपूर्ती सोहळ्यासाठी ४० हजार महिला लाभार्थी आणण्याचे अधिकाऱ्यांना टार्गेट; तलाठ्यांकडे ‘ही’ जबाबदारी

Marathi language: मराठी भाषा ही भारताचा अभिमान! अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर मोदींकडून गौरवोद्गार, वाचा नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT