Multibagger Stocks Sakal
Share Market

Multibagger Stocks Update: 28 हजारांत गुंतवणूकदार झाले कोट्यधीश, तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर?

शिल्पा गुजर

Multibagger Stock Update: कजारिया सिरॅमिक्स (Kajaria Ceramics) ही देशातील सर्वात मोठी टाइल कंपनी परताव्याच्या बाबतीतही सर्वात मोठी असल्याचे समोर आले आहे. त्याच्या शेअर्सने अवघ्या 28 हजारांत आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

केवळ या एका वर्षाचा विचार केला तर आतापर्यंत त्यांत 23 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सध्या हा शेअर 1296.10 रुपयांवर ट्रेड करत आहे. सध्याच्या पातळीवर गुंतवणूक करून तुम्ही सुमारे 30% नफा मिळवू शकता असा विश्वास ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे.

कजारिया सिमेंटचे शेअर्स 11 जुलै 2003 रोजी फक्त 3.60 रुपयांवर होते. आता ते 1296.10 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच 20 वर्षांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 35,903 टक्क्यांनी वाढ झाली आणि ते केवळ 28 हजारांच्या गुंतवणुकीवर कोट्यधीश झाले.

गेल्या वर्षी 14 जुलै 2022 रोजी ते 980 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होते. यानंतर, एका वर्षात सुमारे 38 टक्क्यांनी वाढ झाली आणि ते 1351.05 रुपयांच्या एका वर्षातील उच्चांक गाठला. मात्र, प्रॉफिट बुकींगमुळे त्याची किंमत खाली आली.

कजारिया सिरॅमिक्स ही देशातील सर्वात मोठी टाइल कंपनी आणि जगातील सातवी सर्वात मोठी कंपनी आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या आकडेवारीनुसार, 8.45 कोटी चौरस मीटर टाइल्स बनवण्याची वार्षिक क्षमता आहे.

आता ते सिकंदराबादमध्ये 24 लाख चौरस मीटर क्षमतेची भर घालत आहे. शिवाय जॉईंट व्हेंचरद्वारे नेपाळमध्ये 51 लाख चौरस मीटर क्षमतेचा प्रकल्प उभारत आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये टाइल्स विभागात 13-15 टक्के वार्षिक वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.

याशिवाय निर्यातीत 25 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळेच कजारियाच्या शेअर्सवर ब्रोकरेजने 1,680 च्या टारगेटसह खरेदीचे रेटिंग दिले आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Amit Thackeray: अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला; पण मुंबईतला नाही तर...

Jarange Health Update: उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांनी केल्या कडक शब्दांत सूचना

Latest Marathi News Updates : भाजपशासित सर्व राज्यांमध्ये प्रसादाची तपासणी करावी: मंत्री प्रियांक खर्गे

IND vs BAN: अ‍ॅक्शन रिप्ले! Rohit Sharma दुसऱ्या डावातही फसला; एकाच पद्धतीने पुन्हा OUT झाला

Share Market Closing: आठवड्याच्या शेवटी शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्सने 1400 अंकांनी वाढला, निफ्टी 25,800च्या वर

SCROLL FOR NEXT