IPO Sakal
Share Market

शेअर बाजार : टाटा टेक्नॉलॉजीजचा ‘आयपीओ’!

टाटा म्हणजे विश्वास, टाटा म्हणजे प्रामाणिकपणा, अशी बिरुदावली मिरवणारा आणि जनसामान्यांत मोठी आदराची प्रतिमा असणारा हा उद्योगसमूह माहिती नाही, अशी व्यक्ती सापडणे अवघड.

नंदिनी वैद्य nandineevaidya@yahoo.com

टाटा म्हणजे विश्वास, टाटा म्हणजे प्रामाणिकपणा, अशी बिरुदावली मिरवणारा आणि जनसामान्यांत मोठी आदराची प्रतिमा असणारा हा उद्योगसमूह माहिती नाही, अशी व्यक्ती सापडणे अवघड. गेल्या काही वर्षांमध्ये टाटा समूहाने गुंतवणूकदारांना अक्षरशः भरभरून परतावा दिला आहे.

साहजिकच ‘टाटां’चा कोणताही ‘आयपीओ’ बाजारात येणार म्हटल्यावर गुंतवणूकदारांच्या त्यावर उड्या पडणार हे निश्चितच! ‘टाटां’ची अजून एक कंपनी शेअर बाजारात प्रवेश करत आहे आणि ती म्हणजे ‘टाटा टेक्नॉलॉजीज लि.’ तीस वर्षे जुन्या असलेल्या या कंपनीचा बहुचर्चित ‘आयपीओ’ येत्या २२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान खुला होत आहे.

या ‘आयपीओ’साठी किंमतपट्टा प्रति शेअर ४७५ ते ५०० रुपये असून, किमान ३० शेअर व त्याच्या पटीत अर्ज करता येईल. टाटा टेक्नॉलॉजीज लि. ही इंजिनिअरिंग सर्व्हिस, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, डिजिटल इंजिनिअरिंग सोल्युशन्समध्ये काम करते. टाटा मोटर्स आणि जग्वार हेच कंपनीचे मोठे (४० टक्के) ग्राहक असल्यामुळे साहजिकच ऑटोमोबाईल संबंधित उत्पन्न एकूण उत्पन्नाच्या ७५ टक्के आहे.

या व्यतिरिक्त ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, इंडस्ट्रियल हेवी मशिनरी या क्षेत्रातही टाटा टेक्नॉलॉजीज काम करत आहे. १२००० हून अधिक कर्मचारी, १९ ग्लोबल डिलिव्हरी सेंटर, एशिया-पॅसिफिक, युरोप, उत्तर अमेरिका अशा तीन खंडांमध्ये आणि २७ देशांमध्ये तिचा व्यवसाय पसरला आहे. त्यावरून कंपनीच्या विस्ताराची कल्पना येईल.

आर्थिक वाटचाल

कंपनीची आर्थिक वाटचाल उत्तमच चालू आहे. गेल्या दोन वर्षांत निव्वळ नफा रु. २३९ कोटींवरून ६२४ कोटी रुपयांपर्यंत वाढला, तर उत्पन्न रु. २४२५ कोटींवरून ४,५०१ कोटींपर्यंत पोचले आहे. सप्टेंबरअखेर संपलेल्या सहामाहीत उत्पन्न २५८७ कोटी रुपये, तर नफा ३५२ कोटी रुपये झाला आहे.

महत्त्वाच्या बाबी

१. टाटा मोटर्स अथवा टाटा मोटर्स डीव्हीआरचे जे भागधारक आहेत, त्यांच्यासाठी राखीव कोटा ठेवण्यात आला आहे. भागधारक ठरविण्याची अंतिम तारीख १३/११/२३ होती.

२. भागधारक छोटे गुंतवणूकदार म्हणून किंवा एचएनआय कोट्यामधून अर्ज करू शकतील.

३. भागधारक म्हणून अर्ज केल्यास, जितक्या शेअरसाठी अर्ज केला आहे, त्या प्रमाणात शेअरवाटप होईल.

वरील सर्व घटकांचा गोषवारा घेतला, तर टाटा टेक्नॉलॉजीजचे कामकाज सर्व आघाड्यांवर उत्तम चालू असल्याचे स्पष्ट होते. वाहन क्षेत्र सध्या तेजीत असल्यामुळे कंपनीसाठीदेखील येणारा भविष्यकाळ उत्तम राहील. तसेच या क्षेत्रातील शेअर बाजारात असणाऱ्या एल अँड टी टेक्नॉलॉजी, केपीआयटी टेक्नॉलॉजी, टाटा एलेक्सी यांच्या बाजारभावाचा विचार करता, कंपनीने ठरविलेली इश्‍यू किंमतदेखील वाजवी आहे.

थोडक्यात, टाटा टेक्नॉलॉजीजच्या ‘आयपीओ’च्या निमित्ताने सुवर्णसंधी चालून आली आहे आणि तीदेखील आकर्षक किमतीत! त्यामुळे गुंतवणूकदारांनी निश्चितच यासाठी अर्ज करावा. परंतु, शेअर नाही मिळाले तरी निराश न होता नोंदणी झाल्यानंतर आगामी काळात ते खरेदी करत राहावे, हे उत्तम!

मूल्य

पी/ई रेशो : ३२.५३

बाजारमूल्य : रु. २०२८३.४३ कोटी

ईपीएस : रु. १५.३७

रिटर्न ऑन नेटवर्थ : २०.८७ टक्के

(लेखिका ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासानुसार विश्लेषण केले आहे. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी प्रत्यक्ष गुंतवणुकीचा निर्णय आपापल्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT