NBCC Bonus Share News Esakal
Share Market

NBCC Bonus Share: तुमच्याकडे आहेत का 'या' सरकारी कंपनीचे शेअर्स? गुंतवणूकदारांना मिळणार बंपर बोनस

NBCC Bonus Share News: बोनस शेअर्ससाठी सदस्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी मंडळाने सोमवार, 07 ऑक्टोबर 2024 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.

आशुतोष मसगौंडे

सरकारी कंपनी NBCC (इंडिया) लिमिटेडच्या बोर्डाने बोनस शेअर्स देण्यास हिरवा सिग्नल दिला आहे. गुंतवणूकदारांना दोन शेअर्सवर एख शेअर बोनस मिळणार आहे. यासाठी कंपनीला 90 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

नियामक फाइलिंगमध्ये कंपनीने म्हटले आहे की, बोर्डाने बोनस शेअर्स जारी करण्यास आणि रेकॉर्ड डेट निश्चित करण्यास मान्यता दिली आहे.

बोनस शेअर्ससाठी सदस्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी मंडळाने सोमवार, 07 ऑक्टोबर 2024 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.

बांधकाम कामांशी संबंधित असलेल्या NBCC या सरकारी कंपनीने म्हटले आहे की, संचालक मंडळाने 1:2 च्या प्रमाणात भागधारकांना बोनस शेअर्स देण्याची शिफारस केली आहे, म्हणजेच रेकॉर्ड तारखेनुसार पात्र सदस्यांना प्रत्येक दोन शअर्ससाठी 1 रुपये. रु.चा नवीन पेड-अप इक्विटी शेअर जारी करण्यात येईल.

बोनस शेअर्स देण्यासाठी कंपनी 90 कोटी रुपये खर्च करणार आहे. ही रक्कम कंपनी आपल्या राखीव निधीतून खर्च करेल.

यापूर्वी फेब्रुवारी 2017 मध्ये कंपनीने 1:2 च्या प्रमाणात बोनस शेअर जारी केले होते. बोनस शेअर्स हे विद्यमान गुंतवणूकदारांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय दिलेले अतिरिक्त शेअर्स असतात, जे शेअरहोल्डरच्या शेअर्सच्या संख्येवर आधारित असतात.

एनबीसीसीची कामगिरी

NBCC चा शेअर शुक्रवारी 4.22 टक्क्यांच्या घसरणीसह NSE वर 186.60 रुपयांवर बंद झाला. नवरत्न स्टॉकने गेल्या एका वर्षात 262.97 टक्के उत्कृष्ट रिटर्न दिला आहे. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 209.75 रुपये आहे.

31 ऑगस्टपर्यंत NBCC चे मार्केट कॅप 33,543 कोटी रुपये होते. PSU शेअर्स गेल्या तीन महिन्यांत 35.72 टक्के, गेल्या सहा महिन्यांत 37.93 टक्के आणि 2024 मध्ये आतापर्यंत 127.84 टक्के वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्रच नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

SCROLL FOR NEXT