Netweb Technologies IPO : नेटवेब टेक्नेालॉजीज इंडिया लिमिटेडने (Netweb Technologies India Ltd) आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत. कंपनीला या पब्लिक इश्यूमधून 700 कोटी रुपये उभारायचे आहेत. कंपनीने दाखल केलेल्या ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टसनुसार आयपीओमध्ये 257 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. त्याच वेळी प्रमोटर्स 85 लाख इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) विकतील.
ड्राफ्ट पेपरनुसार संजय लोढा, विवेक लोढा, नवीन लोढा, नीरज लोढा आणि अशोक बजाज ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड ओएफएसमध्ये शेअर्स विकतील. प्री-आयपीओ प्लेसमेंटद्वारे कंपनी 51 कोटी रुपये उभारू शकते. जर कंपनीने ही रक्कम वाढवली तर नवीन इश्यूचा आकार कमी होईल.
आयपीओची साईज 600-700 कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकते. फ्रेश इश्यूद्वारे उभारलेली रक्कम 32.77 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चासाठी, 128.02 कोटी रुपयांच्या वर्किंग कॅपिटलसाठी, 22.5 कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी आणि इतर व्यावसायिक गरजांसाठी वापरली जाईल. या आयपीओसाठी इक्विरस कॅपिटल आणि आयआयएफएस सिक्युरिटीज यांची बुक-रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दिल्ली-एनसीआरचे नेटवेब टेक्नॉलॉजीज हे देशातील आघाडीच्या हाय-एंड कॉम्प्युटिंग सोल्यूशन्स प्रोव्हायडर्सपैकी एक आहे. यासोबतच या कंपनीची सरकारच्या पीएलआय स्कीमसाठीही निवड झाली आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये, कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल 73 टक्क्यांनी वाढून 247.03 कोटी रुपये झाला, जो एका वर्षापूर्वी 142.79 कोटी रुपये होता. त्याच वेळी, या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 8.23 कोटी रुपयांवरून 22.45 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.