Nifty 50, Sensex see deep cuts as investors lose about rs 3 lakh crore in a day  Sakal
Share Market

Share Market Closing: बँकिंग आणि मेटल शेअर्सच्या विक्रीमुळे बाजार कोसळला; सेन्सेक्स 670 अंकांनी घसरला

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 8 January 2024: सोमवारी शेअर बाजारात जोरदार विक्री झाली. FMCG क्षेत्रात जोरदार घसरण झाली. पीएसयू बँकिंग आणि मेटल सेक्टरमध्येही मोठी घसरण झाली. परिणामी बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 670 अंकांनी घसरला आणि 71,355 वर बंद झाला. निफ्टीही 197 अंकांनी घसरून 21,513 वर आला.

निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 1.09 टक्क्यांनी घसरला तर बीएसई स्मॉल कॅप 0.28 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक एक टक्क्याहून अधिक घसरणीसह बंद झाले.

सोमवारी अदानी पोर्ट्स, ओएनजीसी, एचसीएल टेक आणि हीरो मोटोकॉर्पच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर यूपीएल, नेस्ले इंडिया, एसबीआय लाईफ आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

घसरण झालेल्या शेअर्समध्ये देवयानी इंटरनॅशनल, टाटा मोटर्स, पटेल इंजिनीअरिंग, एचडीएफसी लाईफ, जिओ फायनान्शिअल, आयसीआयसीआय बँक, ग्लोबल स्पिरिट, एक्साइड इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया, स्टोव्ह क्राफ्ट, होम फर्स्ट फायनान्स यांचा समावेश होता.

युनी पार्ट्स इंडिया लिमिटेड आणि कामधेनूच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली. अदानीच्या 10 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांचे शेअर्स घसरले तर अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स किरकोळ वाढीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांचे 2.76 लाख कोटी रुपयांचे नुकसान

BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 8 जानेवारी रोजी 366.56 लाख कोटी रुपयांवर खाली आले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवारी 5 जानेवारी रोजी 369.32 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.76 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.76 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apple च्या आयफोन 16 सीरीजच्या विक्रीला सुरूवात, मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी रांग

Work Stress : अति ताणतणावाचा कर्मचाऱ्यांना धसका, मानसिकतेवर परिणाम; आयटी क्षेत्रात सर्वाधिक प्रमाण

China Open 2024 : मालविका बन्सोडचा पुन्हा धडाकेबाज विजय; चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश

Latest Marathi News Updates : आग्रा-दिल्ली रेल्वे मार्गावर ट्रॅक कोसळला; 42 गाड्यांचे बदलले मार्ग

IIFL Finance: आरबीआयने IIFL फायनान्सला दिला मोठा दिलासा; गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी मागे, कंपनीच्या शेअर्सवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT