Nifty All Time High: शेअर बाजारातील विक्रमी उच्चांकाची मालिका सुरूच आहे. आज एनएसई निफ्टीने शेअर बाजारात 21,848.20चा ऐतिहासिक विक्रमी उच्चांक गाठला आहे. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 28 शेअर्स वाढताना दिसत आहेत आणि 22 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीच्या सर्वाधिक वाढणाऱ्या शेअर्समध्ये, इन्फोसिस 7.63 टक्क्यांनी वर आहे.
विप्रो 4.36 टक्क्यांनी आणि टेक महिंद्रा 4.29 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. TCS 3.91 टक्के आणि ONGC 3.87 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. बँक निफ्टी 250 अंकांनी वाढताना दिसत आहे आणि 12 बँक शेअर्सपैकी 11 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत.
निफ्टी आयटी निर्देशांक 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे आणि आज तो एका वर्षाच्या उच्चांकावरून 5 टक्क्यांनी वाढला आहे. काल इन्फोसिस आणि टीसीएसचे तिमाही निकाल आले आणि आज त्याचा परिणाम या दोन्ही निर्देशांकांवर दिसत आहे. इन्फोसिस 7 टक्क्यांहून अधिक वाढला आहे आणि निफ्टीचा टॉप गेनर बनला आहे.
आज गुंतवणूकदार एचसीएल टेक, विप्रो आणि एचडीएफसी लाइफच्या शेअर्सवर लक्ष ठेवणार आहेत कारण या कंपन्या तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत. त्याचा परिणाम शेअर बाजारावर होणार आहे.
सेन्सेक्समधील आजचा इंट्राडे उच्चांक 72,434.58 आहे आणि त्यात 700 हून अधिक अंकांची वाढ झाली आहे. सेन्सेक्सचा ऐतिहासिक विक्रमी उच्चांक 72,561.91 आहे आणि तो ओलांडण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.