Sensex, Nifty 50 Sakal
Share Market

Share Market Closing: निफ्टी विक्रमी उच्चांकावर बंद; सेन्सेक्स 73,150 पार, कोणत्या क्षेत्रात तेजी?

Share Market Today: गुरुवारी शेअर बाजारात मोठी वाढ दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात बाजारात विक्री झाली, त्यानंतर आयटी आणि वाहन क्षेत्रात उत्साह दिसून आला. यामुळे निफ्टीने प्रथमच 22,250ची विक्रमी पातळी ओलांडली.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 22 February 2024: गुरुवारी शेअर बाजारात मोठी वाढ दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात बाजारात विक्री झाली, त्यानंतर आयटी आणि वाहन क्षेत्रात उत्साह दिसून आला. यामुळे निफ्टीने प्रथमच 22,250ची विक्रमी पातळी ओलांडली. अखेर निर्देशांक 162 अंकांनी वाढून 22,217 च्या विक्रमी पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सही 535 अंकांनी वाढून 73,158 वर पोहोचला.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजारात गुरुवारी निफ्टी बँक निर्देशांक वगळता इतर सर्व निर्देशांक वाढीसह बंद झाले. शेअर बाजारात वाढ झालेल्या कंपन्यांमध्ये बजाज ऑटो, एचसीएल टेक, आयशर मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, कोल इंडिया, टीसीएस आणि आयटीसी या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता.

शेअर बाजारात मोठी वाढ

कोणते शेअर्स घसरले?

शेअर बाजारातील सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, बीपीसीएल, एचयूएल, हीरो मोटो आणि एसबीआयचे शेअर्स होते.

महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि अपोलो हॉस्पिटलचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले होते. पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन आणि व्हर्लपूल इंडियाचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होते.

S&P BSE SENSEX

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत

काही काळापासून गुंतवणूकदारांनी खासगी बँकांचे शेअर्स घेण्यास सुरुवात केल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समधून बाहेर पडून, किरकोळ गुंतवणूकदार मोठ्या खाजगी बँकांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहेत जे सध्या तेजीत आहेत.

मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ

आज शेअर बाजारात मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. आज बाजार बंद होताना, बीएसई सेन्सेक्सचे मार्केट कॅप 392.19 लाख कोटी रुपये होते, जे विक्रमी पातळीवर बंद झाले. तर गेल्या ट्रेडिंग सत्रात मार्केट कॅप 388.87 लाख कोटी रुपये होते. आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये 3.32 लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक विक्रमी उच्चांकावर

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअर्स गुरुवारी 7.34% वाढले आणि 2,213.95 च्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ 4,000 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर झाली आहे. मुंबई बेस्टच्या बसेससाठी कंपनीला ही ऑर्डर मिळाली आहे.

कंपनी मुंबईत धावणाऱ्या 2,400 बेस्ट इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करणार आहे. ही ऑर्डर 18 महिन्यांत पूर्ण होईल. गेल्या 12 महिन्यांत स्टॉक 470% वाढला आहे. सध्या तो 6.18% वाढून 2,190 रुपयांवर व्यवहार करत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT