Share Market latest updates  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजार नव्या शिखरावर; निफ्टीने पहिल्यांदाच ओलांडला 22,200चा टप्पा, कोणते शेअर्स तेजीत?

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 20 February 2024: आज शेअर बाजारात मोठी वाढ झाली. प्रमुख बाजार निर्देशांक नवीन विक्रमी उच्चांकावर व्यवहार करत होते. सेन्सेक्सने 73,000 चा टप्पा ओलांडला. निफ्टीने प्रथमच 22,200 च्या विक्रमी पातळीला स्पर्श केला आहे.

बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात जोरदार खरेदी झाल्याने बाजारात उत्साह होता. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले होते. तर Hero MotoCorp सर्वाधिक घसरला.

शेअर बाजारात मोठी वाढ

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजारात निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी, निफ्टी आयटी निर्देशांकात घसरण झाली. निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या निर्देशांकात वाढ झाली.

S&P BSE SENSEX

मंगळवारी शेअर बाजारातील टॉप गेनर्समध्ये पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक आणि एनटीपीसी यांचा समावेश होता, तर सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये टीसीएस, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर्स होते.

कोणते शेअर्स वाढले?

आज पटेल इंजिनीअरिंग, ब्रँड कॉन्सेप्ट, कामधेनू लिमिटेड, जिओ फायनान्शियल, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, युनिपार्ट्स, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ, नेस्ले, ओएनजीसी, ग्लोबस स्पिरिट आणि लार्सन अँड टुब्रो, देवयानी इंटरनॅशनल, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी लाईफ आणि महिंद्रा महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली.

झी एंटरटेनमेंटमध्ये 10% अप्पर सर्किट

मंगळवारी, झी एंटरटेनमेंटचे शेअर्स 10% च्या वरच्या सर्किटवर आले. मंगळवारी कंपनीचे शेअर्स 10% वाढून 196.35 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले. झी-सोनी प्रकरणाशी संबंधित वकिलांमध्ये झालेल्या चर्चेच्या वृत्तानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली.

ओएनजीसीचे शेअर्स 9 वर्षांच्या उच्चांकावर

ओएनजीसीचे शेअर्स मंगळवारी 9 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले. कंपनीच्या सायप्रस युनिट इम्पीरियल एनर्जी लिमिटेडने कंपनीमध्ये विलीनीकरणास मान्यता दिल्यानंतर शेअर्समध्ये ही वाढ झाली.

इम्पीरियल एनर्जी लिमिटेड ही ONGC विदेशची उपकंपनी आहे. ONGC Videsh च्या सायप्रस आणि रशियामध्ये एकूण 7 स्टेप डाउन उपकंपन्या आहेत. या 7 पैकी 5 जणांनी विलीनीकरणास मान्यता दिली आहे.

या 5 उपकंपन्या म्हणजे इम्पीरियल एनर्जी सायप्रस लिमिटेड, इम्पीरियल एनर्जी नॉर्ड लिमिटेड, इम्पीरियल फ्रॅक सर्व्हिसेस सायप्रस लिमिटेड, रॅडक्लिफ होल्डिंग्स लिमिटेड, बियांकस होल्डिंग लिमिटेड.

गुंतवणूकदारांचे 11,000 कोटी रुपयांचे नुकसान

BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 20 फेब्रुवारी रोजी 391.58 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवारी 19 फेब्रुवारी रोजी बाजार भांडवल 391.69 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, बीएसईमध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 11,000 कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 11,000 कोटी रुपयांची घट झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : Ramandeep Singh चा अविश्वसनीय झेल; पाकिस्तानी खेळाडू बघतच बसले, फलंदाजाने मारला डोक्यावर हात Video Viral

Delhi Bullet Fire: दिल्लीतील वेलकम मार्केटमध्ये जीन्स विक्रेत्यांमध्ये पैशांवरुन राडा! बंदुकीचे 17 राऊंड फायर, तरुणी जखमी

Nashik Rain: नाशिकच्या चांदवडमध्ये तुफान पाऊस! तामटीचा पाझर तलाव फुटला; नागरिकांचं स्थलांतर

IND vs PAK : दे दना दन...! तिलक वर्माच्या संघातील फलंदाजांनी पाकिस्तानची केली धुलाई

Ambernath Vidhansabha: राष्ट्रीय समाज पक्षाकडून अंबरनाथसाठी रुपेश थोरात यांच्या नावावर अखेर शिक्कमोर्तब!

SCROLL FOR NEXT