Share Market  Sakal
Share Market

BSE आणि NSE जाणार गुजरातला? IFSC मध्ये होऊ शकतात विलीन, काय आहे प्लॅन

Possible Merger of NSE IFSC and India INX: NSE आणि BSE लवकरच विलीन होऊ शकतात.

राहुल शेळके

Possible Merger of NSE IFSC and India INX: NSE आणि BSE लवकरच विलीन होऊ शकतात. गुजरातच्‍या गांधीनगरमध्‍ये IFSC म्हणजेच इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर आहे, ज्यामध्‍ये BSE INX आणि NSE INX विलीन केले जाऊ शकतात.

BSE INX आणि NSE INX विदेशी एक्सचेंजशी स्पर्धा करतात, ज्यात हाँगकाँग, सिंगापूर आणि दुबई सारख्या एक्सचेंजचा समावेश आहे. इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर अथॉरिटी (IFSCA) ला विश्वास आहे की जर BSE INX आणि NSE INX विलीन झाले तर ते परकीय चलनाशी चांगली स्पर्धा करू शकतील.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बीएसईच्या गिफ्ट सिटी युनिट्सचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आणि दोन्ही एक्सचेंजेस या महिन्याच्या अखेरीस नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) कडे अर्ज करण्याची शक्यता आहे. एका प्रमुख नियामक अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विलीनीकरणाच्या प्रस्तावाला दोन्ही एक्सचेंजच्या संचालक मंडळांनी मंजुरी दिली आहे. देशांतर्गत व्यापाराच्या बाबतीत बीएसई आणि एनएसई एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. बीएसईने यावर भाष्य करण्यास नकार दिला, तर एनएसईनेही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

गिफ्ट सिटीच्या आणखी विस्तारावर भर

सरकार आणि बाजार एक्सचेंजचे लक्ष आहे की बीएसई INX आणि NSE INX शक्य तितक्या लवकर विलीन केले जावे, जेणेकरुन भारताकडे परदेशी एक्सचेंजशी स्पर्धा करण्यासाठी एक मोठी संस्था असेल. दोन्ही विलीन झाल्यास देशाला मोठा फायदा होऊ शकतो, असे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT