Upcoming IPO List: 2024मध्ये अनेक कंपन्यांनी त्यांचे आयपीओ आणले आहेत. या वर्षात बजाज हाउसिंग फायनान्स आणि ओला इलेक्ट्रिकसह अनेक मोठ्या आयपीओंनी बाजारात प्रवेश केला. पण IPO मार्केटमध्ये आणखी मोठ्या कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात दाखल होणार आहेत.
या माध्यमातून बाजारातून सुमारे 60 हजार कोटी रुपये उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्या बड्या कंपन्यांनी IPO लॉन्च केला आहे त्यात Hyundai Motor India, Swiggy आणि NTPC ग्रीन एनर्जी यांचा समावेश आहे.
Afcons Infrastructure, Waaree Energies, Niva Bupa Health Insurance, Mobikwik आणि Garuda Construction सारख्या कंपन्या देखील शेअर बाजारात प्रवेश करण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, डिसेंबरपर्यंत विविध क्षेत्रातील सुमारे 30 आयपीओ येऊ शकतात.
गेल्या वर्षातील बहुतांश आयपीओच्या यशामुळे इतर कंपन्यांनाही आयपीओ आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या काळात देशांतर्गतच नव्हे तर परदेशी गुंतवणूकदारही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. अशा परिस्थितीत, कंपन्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी ही सर्वात योग्य वेळ वाटत आहे.
यातील सर्वात मोठा IPO Hyundai Motor India चा असू शकतो. कंपनी सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा IPO आणू शकते. यासह हा देशातील सर्वात मोठा IPO ठरणार आहे. आतापर्यंत LIC इंडियाचा 21 हजार कोटी रुपयांचा IPO सर्वात मोठा मानला जातो. याशिवाय स्विगी 10 हजार कोटी रुपयांचा आयपीओ आणण्याची तयारी करत आहे.
दुसरीकडे, एनटीपीसी ग्रीन एनर्जी देखील सुमारे 10 हजार कोटी रुपयांच्या आयपीओची तयारी करत आहे. हा IPO नोव्हेंबरमध्ये येऊ शकतो. शापूरजी पालोनजी समूहाच्या Afcons इन्फ्रास्ट्रक्चरचा IPO सुमारे 7000 कोटी रुपयांचा असेल.
Vari Energies बाजारात 3000 कोटी रुपयांचा IPO देखील लॉन्च करू शकतो. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सचा IPO सुमारे 3000 कोटी रुपयांचा असेल आणि MobiKwik चा IPO 700 कोटी रुपयांचा असेल.
या वर्षात आतापर्यंत 62 कंपन्यांनी 64,000 कोटी रुपयांचे IPO बाजारात आणले आहेत. 2023 मध्ये 57 कंपन्यांनी 49,436 कोटी रुपयांचे IPO लॉन्च केले होते. 2025 मध्ये हा आकडा आणखी वाढू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.