Multibagger Stock  sakal
Share Market

Multibagger Stock : 7000 हून अधिक इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर; एका वर्षात 5 पट परतावा, 'या' शेअरने केली कमाल

सकाळ वृत्तसेवा

इलेक्ट्रिक बस बनवणारी देशातील पहिली कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेकच्या (Olectra Greentech) शेअर्समध्ये सध्या चांगली वाढ दिसून येत आहे. चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना त्यांनी 4609 टक्के परतावा दिला आहे आणि एका वर्षात भांडवल पाच पटीने वाढले आहे. कोरोना काळात, 27 मार्च 2020 रोजी त्याच्या शेअर्सची किंमत 42.35 रुपये होती.

सध्या हे शेअर्स 2.46 टक्क्यांच्या वाढीसह 1994.30 रुपयांवर ट्रेड करत आहे. इंट्रा-डेमध्ये शेअर्स 2134.50 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. सध्या तो या उच्चांकावरून 6 टक्क्यांहून अधिक खाली आहे. गेल्या पाच आर्थिक वर्षांपासून कंपनीचा नफा वेगाने वाढत आहे. आर्थिक वर्ष 2021 वगळता गेल्या पाच आर्थिक वर्षांत ऑलेक्ट्रा ग्रीनटेकच्या विक्रीत सातत्याने वाढ झाली आहे.

आर्थिक वर्ष 2019 मध्ये त्याची विक्री 290.3 कोटी होती, जी आर्थिक वर्ष 2020 मध्ये वाढून 295.33 कोटी झाली, पण आर्थिक वर्ष 2021 मध्ये ती 277.22 कोटी रुपयांवर घसरली. पण नंतर आर्थिक वर्ष 2022 मध्ये ती 585.43 कोटीवर गेला आणि नंतर आर्थिक वर्ष 2023 मध्ये विक्री 1134.41 कोटीवर पोहोचली.

नव्या फॅसिलिटीमध्ये जुलै 2024 पासून प्रोडक्शन सुरु होईल, ज्याची क्षमता सुरुवातीला 5 हजार बसेस बनवण्याची आहे. जी नंतर वाढवून 10 हजार बसेसपर्यंत करण्यात येणार आहे. 2025 या आर्थिक वर्षात किमान 2500 बसेस देण्याची कंपनीची योजना आहे. त्यानंतर 9 हजार बसेसच्या ऑर्डर आहेत आणि यापैकी 232 बसेस या आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या सहामाहीत वितरित करण्यात आल्याची माहिती कंपनीचे सीएमडी केव्ही प्रदीप यांनी जानेवारीत दिली होती. दुसऱ्या सहामाहीत 500 बसेस देण्यात येणार आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंकडून लक्ष्मण हाकेंचा "गोंडस लेकरू" म्हणून उल्लेख

Ranji Trophy 2024: जम्मूचा शुभम महाराष्ट्रावर पडतोय भारी; एकट्याने डाव उभारला अन् ठोकले दणदणीत द्विशतक

Uddhav Thackeray Dasra Melava: दसरा मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील 'हे' रस्ते असणार बंद!

Dussehra Melava 2024 Live Updates: मुंडे-जरांगेंच्या मेळाव्यातून रतन टाटांना श्रद्धांजली

सांगलीच्या जागेसाठी 'या' दोन नेत्यांत रस्सीखेच; विश्वजित कदम, विशाल पाटलांकडे कार्यकर्त्यांनी केली 'ही' मागणी

SCROLL FOR NEXT