Paytm stock falls another 20 percent to hit lower circuit on day 2  Sakal
Share Market

Paytm Share: पेटीएमचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी लोअर सर्किटवर; गुंतवणूकदारांचे 'इतक्या' कोटींचे नुकसान

Paytm stock falls another 20 percent to hit lower circuit: पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडचे ​​शेअर्स शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी 20 टक्क्यांच्या लोअर सर्किटवर पोहोचले आहेत. लोअर सर्किट म्हणजे बाजारात कंपनीचे शेअर्स कोणीही खरेदी करत नाही.

राहुल शेळके

Paytm Share Price: पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडचे ​​शेअर्स शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी 20 टक्क्यांच्या लोअर सर्किटवर पोहोचले आहेत. लोअर सर्किट म्हणजे बाजारात कंपनीचे शेअर्स कोणीही खरेदी करत नाही. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर पेटीएमचे शेअर्स 20 टक्क्यांनी घसरून 487.20 रुपयांवर आले आहेत. तसेच पेटीएम शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत.

मध्यवर्ती बँक आरबीआयच्या कारवाईमुळे कंपनीच्या शेअर्सची विक्री झाली आहे. दोन दिवसांपूर्वी आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेच्या व्यवसायावर अनेक निर्बंध लादले होते.

त्यामुळे 1 फेब्रुवारीला शेअर्स लोअर सर्किटवर आले आणि आज पुन्हा लोअर सर्किटवर पोहोचले. दोन दिवसांत पेटीएमचे शेअर्स सुमारे 274 रुपयांनी घसरले असून गुंतवणूकदारांचे सुमारे 17.4 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

आरबीआयच्या कोणत्या कारवाईमुळे शेअर्सची विक्री झाली?

दोन दिवसांपूर्वी, 31 जानेवारी रोजी आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेला ठेवी घेण्यापासून रोखले होते. आता 29 फेब्रुवारीपासून ते ग्राहकांना बँकिंग सेवा देऊ शकणार नाही. याशिवाय, मध्यवर्ती बँकेने क्रेडिट व्यवहारांवर बंदी घातली आहे, म्हणजेच 29 फेब्रुवारीनंतर ठेवी घेणे शक्य होणार नाही आणि क्रेडिट व्यवहार देखील करता येणार नाहीत. Paytm ची मूळ कंपनी One97 Communications ची Paytm पेमेंट बँकेत 49 टक्के हिस्सेदारी आहे.

पेटीएम बंद होणार का?

आरबीआयची ही कारवाई पेटीएम ॲपवर नाही तर पेटीएम पेमेंट बँकेवर झाली आहे. म्हणजेच, जर तुम्ही पेटीएम ॲप वापरत असाल आणि पेटीएम पेमेंट बँकेकडून सेवा घेत नसाल तर ॲपवर कोणताही फरक पडणार नाही. 29 फेब्रुवारीनंतरही तुमचे पेटीएम ॲप पूर्वीप्रमाणेच काम करत राहील.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT